नांदेड / पिराजी गाडेकर
नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा संघाचे घवघवीत यश १७ जिल्ह्यांमधून तृतीय क्रमांकांचा मिळाला सन्मान २ व ३ ऑक्टोबर २०२१ दरम्यान कोपरगाव जि.अहमदनगर येथे नुकतीच संपन्न झाली.
या राज्यस्तरीय ट्रेडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय पंच तथा मुख्य कराटे प्रशिक्षक बाजाजी गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा संघ स्पर्धेला उपस्थित होता या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत आपल्या संघाला घवघवीत यश मिळून दिले आहे.
या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या तीन क्रीडा प्रकारात खेळाडूंनी यश प्राप्त केले आहेत या संघासोबत कु. प्रावती चव्हाण व नितीन देडे होते.
यश प्राप्त झालेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत
कु.पार्वती प्रेमसिंग चव्हाण हिने बेल्ट रेसलिंग गोल्ड मेडल व पॅनक्रेशन ब्राँझ मेडल प्राप्त केले, कु.ईशा उमेश लोखंडे मास रेसलिंग सिल्वर मेडल व बेल्ट रेसलिंग ब्राँझ मेडल, कृष्णा सुनील फेंडर पॅनक्रेशन गोल्ड मेडल, कु.स्फूर्ती देविदास पवळे बेल्ट रेसलिंग ब्राँझ मेडल मास रेसलिंग ब्राँझ मेडल,
कु.विनिता विश्वनाथ पेटकर बेल्ट रेसलिंग सिल्वर मेडल,मास रेसलिंग ब्राँझ मेडल,कु.इशिका इंदल जाधव बेल्ट रेसलिंग गोल्ड मेडल व मास रेसलिंग गोल्ड मेडल , साईराज ईश्वर जाधव बेल्ट रेसलिंग सिल्वर मेडल व पॅनक्रेशन गोल्ड मेडल , श्लोक राम जाधव बेल्ट रेसलिंग गोल्ड मेडल व मास रेसलिंग ब्राँझ मेडल,
साईराज बालाजी शिरडकर बेल्ट रेसलिंग ब्राँझ मेडल व मास रेसलिंग ब्राँझ मेडल, सुयोग गोपीनाथ सूर्यवंशी बेल्ट रेसलिंग ब्राँझ मेडल व मास रेसलिंग ब्राँझ मेडल, आदिती प्रवीणराव बोरकर
बेल्ट रेसलिंगज ब्राँझ मेडल व मास रेसलिंग गोल्ड मेडल,
समर्थ सुनील कल्याणकर बेल्ट रेसलिंग ब्राँझ मेडल व मास रेसलिंग ब्राँझ मेडल, आदित्य राजेश्वर पाटील बेल्ट रेसलिंग ब्राँझ मेडल व मास रेसलिंग गोल्ड मेडल,विर पवन चेपुरवार मास रेसलिंग गोल्ड मेडल, यश हनुमान कोवे बेल्ट रेसलिंग गोल्ड मेडल व मास रेसलिंग गोल्ड मेडल,
जुनेद जावेद शेख
बेल्ट रेसलिंग ब्रांझ मेडल व मास रेसलिंग गोल्ड मेडल
व पॅनक्रेशन सिल्वर मेडल, विवेक राजेश सावते बेल्ट रेसलिंग सिल्वर मेडल व मास रेसलिंग सिल्वर मेडल
इत्यादी खेळाडूंनी राष्ट्रीय पंच बालाजी गाडेकर मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले एकूण स्पर्धेमध्ये विविध क्रीडा प्रकारात १२ गोल्ड मेडल ६ सिल्वर मेडल १५ ब्राँझ मेडल एकूण ३३ मेडल प्राप्त करून महाराष्ट्रातील एकुण सतरा जिल्हे यामध्ये उपस्थित होते त्या मधून नांदेड जिल्ह्याचा तृतीय क्रमांक येण्याचा बहुमान मान मिळविला आहे.
सर्व खेळाडूंनी यश संपादन केले राज्यस्तरीय स्पर्धेत विजय झालेल्या सर्व खेळाडूंचे ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रलोभजी कुलकर्णी राष्ट्रीय खेळाडू पिराजी गाडेकर यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले.
या स्पर्धेमध्ये विजयी गोल्ड मेडल प्राप्त खेळाडूंना गोवा येथे २९ ते ३१ ऑक्टोंबर २०२१ रोजी गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली असून आता महाराष्ट्राचे नेतृत्व या टीम कडे आले आहे.
पुढील स्पर्धेसाठी या जाबाज टीमला नांदेडकरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे.