ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संभाजी ब्रिगेड कंधारचा रास्तारोको..,:तात्काळ मदत जाहीर केली नाही तर रस्त्यावर फिरु देऊ नका –संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे

कंधार
संभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीने उस्मान नगर तालुका कंधार येथील चौकात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे , हेक्टरी 50 हजार रुपये मदत केली पाहिजे व शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेड कंधार तालुक्याच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५०,०००रूपये नुकसान भरपाई द्यावी,शंभर टक्के पिकविमा मंजुर झाला पाहिजे,शेतकर्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे,पिकविमामधील उंबरवटा पद्धत रद्द झाली पाहिजे या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने प्रशासनास वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाकडुन शेतकर्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे ,

आंदोलनामुळे जवळपास एक तास वाहतुक विस्कळीत झाली होती. बाहत्तर तासात पिकविमाकंपनीकडे आॅनलाईन तक्रार दाखल करण्याची जशी अट आहे तसीच बहात्तर तासात शेतकर्‍यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम पिकविमा कंपनी का टाकत नाही असा प्रश्न यावेळी आंदोलन प्रसंगी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी उपस्थित केला.

शेतकर्यांना कोणता सावकार किंवा बँकेचा कोणि मॅनेजर वसुल साठी ञास देत असल तर लाजुन आत्महत्या करण्यापेक्षा त्याच्या मागे रुमने घेउन लागा गरज पडलीच तर संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांना बोलवा, ओला दुष्काळासंदर्भात पश्चिम महाराष्ट्रात वेगळे नियम व मराठवाड्यात नियम असे का?असेही ते म्हणाले येत्या काही दिवसात शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आणखीही तीव्र आंदोलन छेडले जाईल असे मत रास्तो रोकोचे संयोजक संभाजी ब्रिगेड कंधार तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे यांनी मत व्यक्त केले शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर मग शेतकर्‍यांची अशी अवस्था वेळोवेळी का केली जाते,मंञ्यांना आमदार खासदारांना रस्तयाने फिरणे मुश्किल करु असे यावेळी विधानसभा अध्यक्ष माधव घोरबांड यांनी व्यक्त केला. शेतकर्‍यांनी पेराच केला नाही तर नेते,भांडवलदार,प्रशासकीय अधिकारी नोटा खाणार आहेत का असा प्रश्न संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रवक्ते सुदर्शन कदम यांनी व्यक्त केला.जय जिजाऊ जय शिवराय, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, पिकविमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा या घोषणांनी परीसर दणाणुन गेला होता.

रास्तारोको मुळे वाहनांच्या प्रंचड रांगा लागल्या होत्या.उस्माननगरचे पोलिस उपनिरीक्षक पोलिस कर्मचारी यावेळी बंदोबस्तात उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हा प्रवक्ते सुदर्शन कदम,लोहा कंधार विधानसभा अध्यक्ष,माधव घोरबांड, नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष दत्ता येवले लोहा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा सहसचिव कैलास पवळे अंकुश कोल्हे, शहराध्यक्ष विकास पाटील लूगांरे
ता.कार्यध्यक्ष धनंजय कौशल्ये ता.उपाध्यक्ष संभाजी पा.गायकवाड भास्कर कदम नितीन पा.कौसल्ये साईनाथ काळम पवन मुदमवाड पवन घोरबांड गणेश बस्वदे भगवान गायकवाड अनिल पाटील
माणिकराव हंबर्डे सह अनेकांची सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *