कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहर हे ऐतिहासिक शहर आहे कंधारचा किल्ला हा भुईकोट किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे कंधार चे पूर्वीचे नाव पांचाळपुरी असून पांडवाच्या द्रोपदी बरोबर विवाह याच स्थळी झाला अशी अख्यायिका आहे.
कंधार शहर हे बालाघाट रांगेच्या शेवटी मन्याड या नदीच्या खोर्यात वसलेले आहे अशा ह्या ऐतिहासिक शहरांमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे ह्या रुग्णालयांमध्ये अनेक अधिकारी आले आणि गेले सन 2018-19 पासून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे कार्यभार होता. कंधार येथील वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असल्याकारणाने तेथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक पद होते 2019- 20 मध्ये covid-19 ची लाट आली त्यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला अशा या भयानक महामारी च्या काळात कंधार ग्रामीण रुग्णालयात कोणतेच कोणतेच वैद्यकीय अधीक्षक कंधार येथे येण्यास तयार नव्हते.
आशा महामारी च्या काळात आपल्या इथे देवदूत म्हणून कंधार येथील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक मा.निळकंठ भोसीकर यांनी कंधार ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असल्यामुळे कान नाक घसा तज्ञ आदरणीय डॉ. एस. आर .लोणीकर हे महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात उल्लेखनीय वैद्यकीय सेवा अविरतपणे करीत असल्यामुळे सन- 2018 मध्ये नांदेड येथे माजी मुख्यमंत्री मा. ना. अशोकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.शंकरराव चव्हाण सभागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित कार्यकुशल वैद्यकीय अधीक्षक आदरणीय डॉ .एस आर लोणीकर सर यांना कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून दिनांक:-08/10/ 2020 रोजी गुरुवार या दिवशी रुजू झाले.
मा.डॉ. एस .आर. लोणीकर कंधार ग्रामीण रुग्णालयात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले विशेष म्हणजे परिसर अस्वच्छ त्यांनी येथे रुजू झाल्यापासून नीटनेटकेपणा परिसर स्वच्छता ह्यावर भर देऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांना वेळेत येण्यासाठी हजेरी दोन वेळेस केली असे अनेक कामे चांगल्या पद्धतीने सरांनी करून रुग्णालय एक नंबर ठेवले .
विशेष म्हणजेकोरोणा महामारी मध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी वॉर्डबाय स्वच्छता कर्मचारी सर्वांना बोलावून त्यांची पाठ थोपटली आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी छोट्या खाणी पुष्पहार घालून स्वागत केले येथून कोरोना वॉर्डमध्ये जाऊन स्वतः फिरून परिसर आतील वार्ड स्वच्छ आहे किंवा नाही हे पहात होते.
रोज सकाळ संध्याकाळ रुग्णांना तपासणी करणे वेळेवर नाश्ता जेवण देणे हे सर्व गोष्टीचे नियोजन करून यांना वेळेवर औषध उपचार देऊन विचारपूस करत असे पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सर्व काही टापटीप आहे की नाही सर्व बेड स्वच्छ धुऊन आहेत की नाही सॅनिटायझर मास्क दिवसातून दोन-तीन वेळेस साफसफाई करणे इत्यादी कोविड केअर सेंटर मध्ये काम करून घेत होते .
बाथरूम सर्व साप आहे की नाही पाणी आहे की नाही कोविड केअर सेंटर मध्ये स्वतः वैद्यकीय अधीक्षक आतील रुग्णांना तपासून मार्गदर्शन करत होते .
आतापर्यंत आलेले वैद्यकीय अधीक्षक कोणीही असे काम केले नाही सरांमुळे अनेक ग्रामीण रुग्णालयात झाला आहे.
सर रुग्णांना बोलत होते काही घाबरून जाऊ नका तुमच्या अडचणी मला कळवत जा त्यांचे मनोबल वाढत असे काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा कंधार कोविड केअर सेंटर मधील सर्व रुग्ण येथून बरे होऊन गेले.
विशेष म्हणजे एकाचा मृत्यू नाही सर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकक्षक म्हणून आल्यापासून सर्व गोष्टीचे नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने होत आहे सर सकाळी आल्यावर ग्रामीण रुग्णालयातील पाहणी करून आसपासचा परिसर आतील वार्ड स्वच्छता आहे की नाही कर्मचारी अधिकारी वेळेवर येतात की नाही हे सर्व पाहत होते व ग्रामीण रुग्णालयात काय कमी आहे त्याचे नियोजन करणे व ग्रामीण रुग्णालयातील सर्व सेक्शन ला रंगरंगोटी करून नाव व नंबर देऊन सोयीचे केले आहे.
जेणेकरून रुग्णांना सेक्शन शोधण्याची गरज नाही जसे की केस पेपर ,महात्मा फुले योजना,अपघात विभाग, औषधी विभाग,औषधी भांडार ,रुणांना तपासनीसाठी बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग ,लसीकरण विभाग ,महिला प्रसूतिगृह ,महिला कुटुंब नियोजन विभाग,एक्सरे विभाग, अधिपरिचरिका स्टाफ रूम, जनरल स्त्री व पुरुष वॉर्ड, प्रसुती महिला वॉर्ड, ICTC सम्पूदेशन विभाग, दंतशल्य चिकित्सक विभाग,शस्त्रक्रिया गृह,स्वयंपाक गृह,असे प्रत्येक विभागाला नाव व नंबर दिले.
हे काम कोणत्याही अधीक्षकांनी केले नाही सर आल्यापासून राष्ट्रीय कार्यक्रमाचे काम जिल्ह्यात चांगल्या प्रकारे आहे जननी सुरक्षा योजनेचे काम एकदम चांगले आहे तसेच कुटुंब कल्याण नियोजन याचे पण काम एकदम चांगले आहे. सर यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर रुग्णालयाची नावाचे फलक कमान तयार करून लावली जणे करून ग्रामीण रुग्णालयाचे नाव सहज दिसेल व रूग्णांना शोधण्याची गरज नाही.
त्यांना सोयीस्कर होईल किती सांगावे तेवढे कमी आहे आल्याबरोबर रुग्णालयातील प्रवेशद्वारात जाऊन प्रत्येक विभागात मध्ये जाऊन तिथे काय कमी आहे आणि काय करावे लागेल याचे ते नियोजन करून ग्रामीण रुग्णालय कंधारचे नाव कसे उंचावर घेऊन जाण्यास ते आरोग्य सेवेत तत्पर राहतात येथे रुग्ण संख्या कमी होती आयपीडी ओपीडी वाढली सर आल्यापासून बरेच काही चांगले झाले आहे.
आजूबाजूच्या परिसरात घाण कचरा सर्व काढून तेथील एरिया एकदम क्लीन स्वच्छ करण्यात आला सर आल्यापासून माता व बाल संगोपनाचे काम चांगले झाले ओटी बंद होती तीचे आतील भागाचे काम करून ओटी चालू केली गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होईल त्यांना दूर जाण्यापेक्षा जवळच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे आयोजन केले.
आपल्या ग्रामीण रुग्णालयात खेड्यातील गोरगरिबांना जोखमीच्या शास्त्रक्रिया होऊ लागल्या सर आल्यामुळे कुटुंब नियोजन चे काम सुरू झाले सरांना ग्रामीण रुग्णालयात बऱ्याच वेळेस आर्थिक अडचणी आल्या त्यांना तोंड देऊन त्या गोष्टीची पुरतात करून व्यवस्था केली.
राष्ट्रीय कार्यक्रम हत्तीरोग पोलिओ क्षयरोग कुष्ठरोग व तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आयुष्य वैद्यकीय अधिकारी यांनी बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासून त्यांना मार्गदर्शन करून कोविड-19 च्या तघशातील तपासणीसाठी पाठवीत असे तसेच राष्ट्रीय बाल स्वस्थ अधिकारी हे कोविड रुग्णांना तपासणी व उपचार करत असे आतील अधिकारी व कर्मचारी यांनी covid-19 चे काम तसेच कोविड लसीकरण यांच्यावर सध्या भर असून जेणेकरून तिसरी लाट येणार नाही.
याची काळजी घेणे गरजेचे आहे .या कारणाने जिल्ह्याभरात लसीकरणावर जादा भर देण्यात येत आहे ते तरी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्येक वार्ड निहाय गल्ली नगर मंदिर मज्जित बस स्टॅन्ड शिवाजी चौक महाराणा प्रताप चौक गणपती मंडळ प्रत्येक नगर मध्ये जाऊन लोकांना मार्गदर्शन करून त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करून कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन केले आहे .
सरांनी मा. नगर परिषद चे मुख्याधिकारी साहेब यांच्याशी भेटून बैठक घेऊन त्यांना पत्र देऊन नगर परिषद मधील कर्मचारी यांना कंधारचे लसीकरणाचे काम वाढविण्यासाठी बोलावून घेतले आहे.
सर स्वतः अनेक रुग्णांना मार्गदर्शन करून लस घेण्यास प्रवृत्त करत होते लसीकरणाचा सध्या वेग वाढला आहे लसीकरण झालं तर तिसरी लाट येणार नाही याची दक्षता घेत आहेत प्रत्येक वॉर्डात जाऊन स्पीकर लावून लोकांना लस घेण्यास सुरुवात केली बॅनर काढले असे अनेक ठिकाणी जाऊन लोकांना माहिती सांगून लस घेण्यास प्रवृत्त केले .
कंधार येथील जनतेला आवाहन केले तसेच गणपती मंडळ भाजी मंडई भाजीपाले वाले पोस्ट ऑफिस बँक बस स्टॅन्ड सर्वत्र जाऊन आयोजन केले आहे तसेच covid-19 चे घशातील स्वॅब घेऊन रुग्णांची कोविड ची टेस्ट सर्व नगर वाईज जाऊन लोकांची कोविडची ची टेस्ट केली जवळ जवळ होईल लसीकरणाचे काम जवळ जवळ एकुण:-17711 एवढे झाले असून जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम कंधार शहरातील झाले आहे.
जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक होत आहे सध्या पाहता दुसरा डोसवर भर चालू आहे सर आल्यापासून अनेक रुग्णालयांमध्ये नवीन नवीन ऍक्टिव्हिटी दिसून आल्या आरोग्य सेवेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वाढदिवस साजरा करन्यापासून ते प्रमोशन पर्यंतच्या सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले ग्रामीण रुग्णालयात कोविड मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम केले असल्यामुळे त्यांना सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला अनेक प्रकारचे उपक्रम घेण्यात आले अतिशय चांगले वातावरण ग्रामीण रुग्णालयात आहे .
रुग्णालयातील प्रसूती माताचे बाळांच्या रूग्णालयात आनंद उत्सव बर्थडे साजरा या प्रकारचे अनेक प्रोग्राम घेऊन डॉक्टर लोणीकर सर यांनी कर्मचाऱ्याचे अधिकार्याचे मनोबल वाढवून त्यांच्याकडून काम करून घेत असे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार साहेब , वैद्यकीय अधिक्षक साहेब यांनी सर्व बाजारपेठेतील दुकाने कापड दुकाने शॉपिंग सेंटर येथे जाऊन प्रत्येक लोकांचे कोरोना तपासणी करून लोकांची आकडेवारी वाढवित होते.
अनेक प्रोग्राम घेण्यात आले सावित्रीबाई फुले जयंती संविधान दिवस संत गाडगे महाराज जयंती अनेक प्रकारचे राष्ट्रीय प्रोग्राम घेण्यात आले महात्मा गांधी जयंती महावीर जयंती फायर ऑडिट मा.आरोग्य उपसंचालक साहेब यांनी बऱ्याच वेळेस ग्रामीण रुग्णालयास भेटी देऊन सारंच कौतुक केले.
तसेच जिल्हाचे जिल्हा शल्यचिकित्सक साहेब यांची पण ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली त्यांनी सुद्धा सारंच कौतुक केले .
सरांचे काम खूप चांगले आहे .गरोदर माता नोंदणीचे काम वार्षिक उद्दिष्टे 519 मासिक 42 प्रगत 262 टक्केवारी 50%काम
RCH पोर्टल ANC 519 मासिक 42 प्रगत 233 टक्केवारी 45% काम
RCH पोर्टल Child 472 मासिक 40 प्रगत 226 टक्केवारी 48%.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया 288 मासिक 55 प्रगत 191 टक्केवारी 66%.
तांबी 168 मासिक 13 प्रगत 84 टक्केवारी 50%.
प्रधानमंत्री मातृवंदना लाभ 249 मासिक 9 प्रगत 97 टक्केवारी 39%.
जननी सुरक्षा योजना लाभ 142 मासिक 7 प्रगत 52 टक्केवारी 37%.
क्षयरोग घेतलेले थुंकी 2378 मासिक प्रगत 2689 .
घेतलेले पाणी नमुने 120 प्रगत 40 टक्केवारी 33%काम.
PPICUD मासिक 13 प्रगत 54.
PCV -I 472 वार्षिक उद्दिष्टे मासिक 40 प्रगत
95 टक्केवारी 20%काम
PCV-II472 वार्षिक उद्दिष्टे मासिक 05 प्रगत 05 काम.
PCV-III-472 .
DPT Booster 465 वार्षिक उद्दिष्टे मासिक 42 प्रगत 274 टक्केवारी 59%काम कोविड लसीकरणाचे काम दोन्ही डोस जवळजवळ 60% च्या वर आहे जितके सांगावे तितके कमी आहे सर आल्यापासून सर्व सोयी सुविधा ग्रामीण रुग्णालयात झाल्या आहेत त्यामुळे कंधार ग्रामीण रुग्णालयाचे भाग्य आहे
डॉ. एस.आर .लोणीकर सर यांनी कंधार येथील जनतेला लसीकरण करून घेऊन सहकार्य करावे असे आव्हान केले आहे .