फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त फुलवळ ता. कंधार येथे श्री रोकडेश्वर दुर्गामाता नवरात्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
पुढील प्रमाणे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे , ता.७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घटस्थापना व दुर्गा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे . ता.८ऑक्टोबर रोजी जय हनुमान संगीत भजनी मंडळ वाखरडवाडी व रेणुका माता संगीत भजनी मंडळ पोलिसवाडी यांचे रात्री ८ वाजल्यापासून संगीत भजन होईल.
ता. ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता ह.भ.प. कृष्णा महाराज राजूरकर यांचे कीर्तन होईल . तर ता.१० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता श्री १०८ ष. ब्र. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांचे प्रवचन होईल .
ता.११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर ठेवण्यात आले आहे. तर ता. १२ ऑक्टोबर रोजी श्री १०८ ष. ब्र. विरुपक्ष शिवाचार्य महाराज मुखेड यांचे रात्री ८ वाजता प्रवचन होईल.
ता.१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता खुली रांगोळी स्पर्धा आयोजित केली असून त्याचे दोन गटात विभाजन केले आहे , वर्ग ५ ते ७ वी चा लहान गट तर वर्ग ८ ते १० वी चा मोठा गट. आणि रात्री ८ वाजता संतकृपा संगीत भजनी मंडळ चा जागर होईल. तर ता. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता लहान बाल कलाकारांसाठी बुगी वुगी हा गाणे नृत्य चा कार्यक्रम होईल.
ता.१५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता महिषासुराचा वध होईल आणि ता.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर दुर्गादेवी चे विसर्जन होईल.
अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष ओमकार रामराव स्वामी , सचिव पदी ओंमकार पाकांडे , उपाध्यक्ष संतोष मगनाळे, कार्याध्यक्ष गजानन डांगे, कोषाध्यक्ष सचिन मंगनाळे, सदस्य योगेश मंगनाळे, गजानन सोमासे, ओमकार शेंबाळे, बबन रहाटे, सूर्यकांत मंगनाळे, श्रीधर मंगनाळे, नामदेव सोमासे, गजानंन मंगनाळे , संतोष डांगे, परमेश्वर डांगे, संतोष स्वामी, बाबू जाधव यांनी माहिती दिली.