फुलवळ येथिल युवा व्यापारी अविनाश डांगे यांचा तरुणांनी आदर्श घ्यावा – माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी देवकांबळे

फुलवळ ; प्रतिनिधी

आपल्या बेजोड बुद्धीमत्तेच्या बळावर बालवयापासुनच अपार कष्ट करुन व्यापार क्षेत्रामध्ये फुलवळ पंचक्रोशीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करनारे युवा व्यापारी अविनाश डांगे यांचा वाढदिवस फुलवळ नगरीचे माजी.सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी देवकांबळे यांच्या वतीने गजानन भांडी सेंटर & हार्डवेअर येथे जल्लोषात साजरा करण्यात आला.

अविनाश डांगे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासुनच व्यापार क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आपल्या मनमाळावु स्वभावाने एक वेगळी चुणुक दाखवली आहे.त्यांच्या या दिलखुलास स्वभावाचे चाहते फक्त फुलवळ नगरीतच नव्हे तर पंचक्रोशीमध्ये दिसुन येतात.

आपले मोठे बंधु दत्ता डांगे यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांनी व्यापार क्षेत्रामध्ये आपली प्रगती घडवुन आणली आहे.वयाच्या पंचविशीतच त्यांनी युवा उद्योजक हा बहुमान पटकाविला आहे.

फक्त व्यापारच नव्हे तर राजकारण,समाजकारण,शैक्षणीक कार्य याचसोबतच ते विविध धार्मीक कार्यातही सहभागी होत असतात व वेळोवेळी भरीव योगदान देत असतात.

एका दहा बाय दहा च्या किरायाच्या दुकानात भांडी व्यवसायापासुन सुरु झालेल्या त्यांच्या व्यवसाय क्षेत्राचा विस्तार गजानन हार्डवेअर,नेरोलॅक कलर होम,अल्ट्राटेक सिमेंट एजन्सी असा विस्तारला आहे.

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची,मजुरांची,अल्पभुधारकांची नड ओळखुन त्यांनी तालुक्यापेक्षा रास्त भावामध्ये गावामध्येच सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
फुलवळ नगरीचे माजी.सरपंच बालाजी देवकांबळे यांना अविनाश डांगे यांच्या मनमिळावु स्वभावातील पैलु भावल्यामुळे त्यांनी मित्रपरीवाराच्या समवेत त्यांना वाढदिवसाच्या शाल – श्रीफळ देवुन पेढा भरवुन शुभेच्छा दिल्या व पाठीवर कौतुकाची थाप दिली.

यावेळी फुलवळचे उपसरपंच दयानंद रासवते,गोविंद सोमासे,दत्तात्रय डांगे,खलील बिच्छु,आ.श्यामसुंदर शिंदे समर्थक नागेश गोधने,मन्मथ मंगनाळे,अष्टविनायक देवकांबळे व ईतर मित्रपरीवार उपस्थीत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *