ओबीसी ना पुर्ववत आरक्षण दया शिवा संघटना शिष्टमंडळाचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना निवेदन

मुंबई ; ओबीसी ना पुर्ववत आरक्षण दया शिवा संघटनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना निवेदनदि. 07/10/2021, रोज गुरुवारी शिवा संघटना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात भेटले. सुमारे 45 मिनिटे झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन निवेदने दिली.

त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसीना आरक्षण दया :- ओबीसी नां स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुर्ववत आरक्षण देणे, या मुद्द्यावर मा. सर्वोच्च न्यायालयातील ईम्पिरिकल डाटा मिळणे बाबतची याचिका, केंद्र सरकार कडुन ईम्पिरिकल डाटा मिळविणे व

राज्य मागासवर्गीय आयोगाकडुन ईम्पिरिकल डाटा जमा करणे अश्या तिन आघाडयावर राज्य सरकार चे काम युध्द पातळीवर चालु असुन ओबीसी ना लवकरच आरक्षण दिले जाईल असे स्पष्ट आश्वासन शिवा संघटनेच्या शिष्टमंडळाला अजितदादा यांनी दिले .

या शिष्टमंडळात शिवा बिराजदार (ठाणे जिल्हाध्यक्ष, शिवा संघटना) , विनायक म्हमाणे (रायगड जिल्हाध्यक्ष शिवा संघटना), मल्लिकार्जुन डब्बे (ठाणे शहराध्यक्ष), दत्ता पाटील (पनवेल शहराध्यक्ष), बसवेश्वर धोंडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page