कंधार :
कंधार म्हणटले की आठवते राष्ट्रकुट कालीन शिल्पकलेचे माहेरघर.या कंधार तालूक्यातील मजरे धर्मापुरी येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला कलावंत. सुरुवात त्यांनी गुरे-ढोरं वळतांना गुराखी म्हणून लहानपण घलवतांना दगडावर कलम हे माध्यम वापरुन कलेचे धडे गिरवले.
सुरुवातीस कंधार शहरात पेंटर हा व्यवसाय आरंभ केला.त्यानंतर शिल्पकार बनत मंदिराचे काम करत आंध्र,तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्र या चार राज्यात आपल्या कलेचा ठसा उमटून मन्याड खोर्याचे नाव गाजवले.
आज नवरात्र महोत्सव भवानी नगरात भवानी माता.हनुमान, महादेव व भगवान बालाजी या चारही मंदिराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले.त्याच्याशी युगसाक्षी लाइव ने त्यांना बोलके केले.