कंधार : प्रतिनिधी
भारत देश गोऱ्या इंग्रजांच्या गुलामीत 150 वर्ष होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.पहिल्या केंद्रीय मंत्री मंडळात शिक्षण मंत्र्याची धुरा मौलाना अब्दुल कलाम आजाद यांचेवर सोपविण्यात आली.
या आदर्श शिक्षण मंत्री महोदय यांची जयंत 11 नोव्हेंबर रोजी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेच्या मातृशाळेत म्हणजे श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी मौलाना अब्दुल कलाम आजाद यांना अभिवादन करतांना संस्थेचे संस्थापक व संचालक, विद्रोही विचारवंत, माजी खासदार व आमदार, शिक्षण महर्षी डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीने अत्तर लावून अभिवादन केले.या कार्यक्रमात ज्युनियर विभागातील आदर्श प्राध्यापक वडजे सर यांनी आमदार सतिश चव्हाण यांच्या मदतीने संगणक शाळेस मिळवून दिले.त्या बद्दल यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड, उपमुख्याध्यापक डी.पी.कदम, पर्यवेक्षक रमाकांत बडे, उपप्राचार्य सदानंद कांबळे यांचे सहित सुरेश इरलवाड, शेख ऐनोद्दीन, बालाजी परोडवाड, दत्तात्रय एमेकर आदी ची यावेळी उपस्थिती होती