मुखेड -मानवी जीवनात मातृत्वाचे अनन्य साधारण महत्त्व आहे.जगात जी जी मोठी माणसे झाले त्यांना घडविण्यात सर्वाधिक वाटा मातेचा आहे. लहानपणी आईच्या मांडीवर केले गेलेले संस्कार हे नंतर जगातल्या कुठल्याही विद्यापीठात केल्या गेलेल्या संस्कारापेक्षा महत्त्वाचे असतात. आईची मांडी ही मुलांसाठी पहिले विद्यापीठ असतं,पहिलं संस्कारपीठ असतं. प्रभू रामचंद्र, शंकराचार्य, महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व यासारख्या अनेक महान विभुतींना घडविण्यात त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा राहीला आहे.
परंतु अलीकडच्या काळामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे,श्रावण बाळ योजना सारख्या योजना यायला लागल्या आहेत, न्यायालयाला आपल्या आई-वडिलांना पोसा अशा प्रकारचा निर्णय द्यावा लागतो आहे यातून भारतीय संस्कृती लयाला जाते की काय अशा प्रकारची शंका वाटायला लागली असल्यामुळे आपण सर्वांनी आपल्या मातृत्वाच्या परीसाला जपावे अशा प्रकारचे आवाहन सूप्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांनी मौजे तुपदाळ ता. मुखेड जि.नांदेड येथे कै.अंजनाबाई राजाराम बोडके यांच्या गोड जेवण कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित प्रवचन प्रसंगी दि.१५ नोव्हेंबर २०२१ रोजी बोलताना केले.
पुढे बोलताना प्रा.डॉ. रामकृष्ण बदने म्हणाले की कै. अंजनबाई बोडके यांनी आपल्या मुलांना शिकवत असताना शिक्षणाचे महत्त्व वेळोवेळी त्यांच्या लक्षात आणून दिले. आपल्या मुलांच्या वरती योग्य प्रकारचे संस्कार केल्यामुळेच आज ते आपल्या आयुष्यामध्ये उच्च पदावर कार्य करताना दिसतात.आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईचे परोपरीने महत्त्व विशद केले आहे. सर्व धर्मसंस्थापकांनी, संतांनी,
साहित्यिकांनी,विचारवंतांनी, आई बद्दल भरभरून लिहिले आहे. आई आपल्या लेकरांसाठी सर्वस्व अर्पण करते, ते त्याच्यावरून जीव ओवाळून टाकते.तीच्याकडे त्याग भावना असते. तेंव्हा तीला वृद्धापकाळात आपणही जपले पाहिजे. अस्या ही प्रकारचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.परशुराम राजाराम शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय इंजि. पांडुरंग राजाराम बोडके यांनी केला तर आभार मारोती गीरी यांनी मानले.
कार्यक्रमास राजाराम सखाराम बोडके गुरुजी, नारायण दोमाटे, तूकाराम दोमाटे, उद्धव हिवराळे, बजरंग पाटील, अशोक पाटील, बालाजी बोडके,माधव बोडके, पांडुरंग बोडके, सचिन दोमाटे,प्रा.सौ.अनिता परशुराम शिंदे, सौ मंगलताई पांडुरंग बोडके व ग्रामस्थ बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.