कंधार
माजी जिप सदस्य
डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ यांचा मानवता जपणारा उपक्रम “भाऊचा डबा” हा उपक्रम गेल्या 7 महिन्या पासुन चालू असुन कोरोना काळात अनेक गरजु वंताना वेळेवर जेवण मिळाले आहे. या उपक्रमाला यशस्वी पणे २०० दिवस पुर्ण झाल्या बदल आज बुधवार दि 17 नोव्हेबर रोजी शेकापचे माजी आमदा भाई गुरुनाथ राव कुरुडे यांच्या हस्ते प्रतिकात्मक टिफीन डबा देवून धोंडगे यांचा सत्कार केला आहे.
नाबाद २०० दिवस भाउचा डब्बा उपक्रम चालू असल्याने कंधार येथिल हरहुनरी कला शिक्षक दत्तात्रय एमेकर यांनी आज स्वतःच्या खर्चातून सदरील प्रतिकात्मक डब्बा देवून हा उपक्रम पुढे चालूच राहावा यासाठी सत्कार कार्यक्रम घडवून आणला आहे.
या.प्रसंगी संस्थेचे सदस्य प्रा.वैजनाथराव कुरुडे,प्रा.प्रदिप गरुडकर, बालाजी परोडवाड, अभंग लोखंडे,निलेश गायकवाड, बळीराम पेठकर जितेंद्र ढगे,आकाश कदम आदीजण उपस्थित होते.
कोरोना महासंकटात कोरोनाग्रस्त रुग्ण अन् नातेवाईकांना लाॅकडाउन असल्यामुळेच अनेक संकटास सामोरे जावे लागले.ही नड लक्षात घेता श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेचे तरुण तडफदार अध्यक्ष डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी मानवतेचा दृष्टीकोन नजरे समोर ठेवून सुरु केलेला भाऊचा डबा हा उपक्रम पाहता-पहाता २०० दिवसाचा टप्पा पार करुन ३०० दिवसाकडे आगेकुच करतो आहे.भाऊच्या डबा १०० दिवसाचा झाला होता,तेंव्हा गुलाब पुष्पहारांनी डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांचे विधानसभेत केलेल्या भाषणांचे बारा खंड प्रकाशित केले होते त्या वर्गीकरण टिमच्या वतीने करण्यात आला होता.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेतील मातृशाळा श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड या ज्ञानालयाचे ग्रंथपाल, सुलेखनकार, कंधारी आग्याबोंड व खंदारी वात्रटिकाकार
दत्तात्रय एमेकर गुरुजी यांच्या सर्जनशील कल्पकतेने “भाऊचा डबा”या उपक्रमाने यशस्वी नाबाद २०० दिवसांचा टप्पा पार करुन मैलाचा दगड गाठला.या यशस्वी समाज कार्याबद्दल भाऊचा डबा उपक्रमाचे संयोजक डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे अध्यक्ष महोदयांचा सत्कार भाऊचा डब्यांची प्रतिकात्मक टिफीन डबा ट्राॅफीसम फ्रेम देवून अन् पुष्पहार घालून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील आदर्श सचिव, माजी आमदार व सभापती भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांच्या समर्थ हस्ते ह्रदय सत्कार छ.शंभूराजे इंग्लिश मीडियम स्कूल वीर नागोजी नाईक चौक कंधार येथे करण्यात आला.
या प्रसंगी माझ्या कलेचे उर्जास्त्रोत, माझे मार्गदर्शक माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांनी गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांच्या आग्याबोंड,खंदारी वात्रटिका व शब्दबिंब या काव्याच्या सदरातील काव्य प्रतिभेचे तोंडभर कौतुक करुन लाखमोलाची शाबासकी दिली.