श्रीक्षेत्र माहूर
श्री रेणुकादेवी महाविद्यालय, माहूर येथील उपप्राचार्य, मराठी विभाग प्रमुख तथा पी.एच. डी संशोधक मार्गदर्शक डॉ. राजेंद्र लोणे यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने नुकतीच एम.फिल पदवी प्रदान केली आहे.
त्यांनी यशवंत काॅलेज, नांदेडच्या डॉ. संगिता घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ भुजंग मेश्रामांच्या उलगुलान काव्यसंग्रहातील आदिवासी जीवन दर्शनाचा विवेचक अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. यापूर्वी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली आहे. तसेच शै.व.२०२१-२२ पासून त्यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे .
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, सचिव संध्याताई राठोड, उपाध्यक्ष किशोर जगत, संचालक नकुल राठोड, प्राचार्य डॉ एन जे एम रेड्डी , डॉ. शिवराज बेंबरेकर, डॉ. मार्तंड कुळकर्णी, यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंदानी अभिनंदन केले आहे.