पौराणिक काळातील सावित्रीने जसा तिच्या सत्यवानाचा प्राण वाचवून अन उलटा कडूनच आशीर्वाद मागून घेतला होता. तसाच काहीसा परंतु स्वतःच्या जीवावर उदार होऊन या केवळ 17 वर्षांच्या रणरागिनी ने हाती शिक्षणाचे हत्यार घेऊन मनुष्य रुपी अनेक यमराजांना आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाने निशस्त्र करण्यास भाग पाडले.
वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह झाला. तेव्हा ज्योतीबांनी पहिली भेट म्हणून आपल्या धर्मपत्नी पाटी आणि पेन्सिल दिली. सावित्रीबाईंनी ही भेट आनंदाने स्वीकारली आणि मग ज्ञानार्जन व ज्ञानामृत प्राशन याचा जणू काही अलौकिक सोहळा सुरू झाला. त्यानंतर अवघ्या काही वर्षातच ज्योतीबांनी या क्रांतीज्योती ला घरोघरी अशाच ज्योती प्रज्वलित करण्यासाठी प्रेरित केले आणि म्हणूनच मग इसवीसन1848 रोजी पुण्यात भिडे वाड्यामध्ये हा अखंड ज्ञान याग धगधगता ठेवण्यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू करून जणू. सावित्रीबाईंनी ही भेट आनंदाने स्वीकारली आणि मग ज्ञानार्जन व ज्ञानामृत प्राशन याचा जणू काही अलौकिक सोहळा सुरू झाला.
त्यानंतर अवघ्या काही वर्षातच ज्योतीबांनी या क्रांतीज्योती ला घरोघरी अशाच ज्योती प्रज्वलित करण्यासाठी प्रेरित केले आणि म्हणूनच मग इसवीसन1848 रोजी पुण्यात भिडे वाड्यामध्ये हा अखंड ज्ञान याग धगधगता ठेवण्यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू करून जणू एका उज्वल प्रवासाची वाटचाल सुरू केली, अन म्हणतातच की
"Life is not a bed of roses ".
खरंच असंच काही या तपस्विनी च्या बाबतीतही घडलं. अवघ्या सतरा वर्षांची ठिणगी आपल्या ज्ञानामुळे इतर मुलींच्या जीवनात उज्वल प्रकाश निर्माण करण्यासाठी सिद्ध झाली होती पण तिचा हा प्रवास प्रवाहाच्या विरुद्ध होता. त्यामुळे कडाडून विरोध झाला, चिखलफेक झाली, कधी शेणाचे गोळे तर कधी दगडाच्या जखमा तिला मिळवाव्या लागल्या पण थांबेल ती क्रांतीज्योती कशी तिने यावरही उपाय शोधला. कोणी कितीही त्रास दिला तरी तिला या प्रवासात थांबायचे नव्हते.
जेव्हा सावित्रीबाईंचा हा प्रवास मी पाहते, तेव्हा मला असे वाटते की, खरंतर सावित्रीबाई जेव्हा इतके मोठे कार्य करत होत्या तेव्हा त्या फक्त सतरा वर्षांच्या होत्या म्हणजे त्यांच्या या आत्मविश्वास आणि परिवर्तनवादी वृत्तीला पाहून खरोखर आपण आजच्या काळातील स्त्रियांनी देखील एक धडा घेतला पाहिजे की,
क्रांतीज्योती
सावित्री ने
प्रज्वलित केला
ज्ञानाचा याग
त्यात वाहिल्या
आत्मविश्वास आणि
परिवर्तनाच्या
समिधा खास
ज्या काळात शिक्षण ही एक दुर्लभ आणि अशक्य गोष्ट होती अशा काळात सावित्रीबाईंनी त्याचा अवघड गोष्टी साठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. आणि समाज उद्धारासाठी कार्यप्रवण झाल्या. अरे सतरा वर्षांची ही पोर शिक्षण नाचा ज्ञान याग आरंभ शकते तर आपण आजच्या एकविसाव्या शतकातील, विज्ञान युगातील स्त्रियांनी तर हा क्रांतीज्योती चा वसा अगदी तळागाळातील स्त्रियांपर्यंत पोहोचवला पाहिजे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई या केवळ क्रांतीज्योति नव्हत्या तर ती एक धगधगती ज्वाला होती. स्थितप्रज्ञ तेचा आणि निश्चयाचा महामेरू होती. अशा या मातेच्या जर आपण मुली आहोत तर मग आपण का जाळुन घेतो स्वतःला, का उडी घेतो विहिरीत, का संपवतो स्वतःचा आणि आपल्या पोटच्या पिलांचा जीवन.
ही सावित्री अशी आई होती जिने गर्भारपणाच्या त्रास आणि प्रसूतीच्या कळा सोसल्या नसतील पण तरीही ती अनेकांची माय होती. अन म्हणुनच या जगन्मातेने आपल्या पिलांसाठी जे परिवर्तन घडवून आणलं ते पाहता खरंच वाटतं की आज जे मी लिहीत आहे, जो विचार करत आहे त्याची मूळ जननी हीच तर आहे ना.
" सावित्रीबाई तु
नारी नही
तु चिंगारी थी "
कुठेतरी
वाचले होते की,
मनाने मोठा
तो संत
डोक्याने
मोठा तो पंत
आणि
ज्याच्या दोन्ही तो भाग्यवंत
अशीच तर आहे ना क्रांतीज्योती सावित्री. सावित्रीबाई या एक उत्कृष्ट आणि आदर्श आहेत समस्त नारी वर्गासाठी कारण ज्यांनी प्रत्येक अडचणीवर मात करून प्रतिकूल तेला अनुकूल केले. जो प्रतिकूलतेला अनुकूल करतो तोच खरा तरुण.
त्यामुळे आता आपणही या धगधगत्या ज्वालेचा आदर्श घेऊन स्वतःला सक्षम, समृद्ध, जिद्दी बनवून आणि स्थितप्रज्ञ तिने आपल्या यशस्वी प्रवासाची वाटचाल करूया.
अजूनही आजच्या या समाजात स्त्री काय बोलते यापेक्षा ती कशी दिसते? तिने काय परिधान केले आहे? अशा गोष्टींकडे आवर्जून लक्ष केंद्रित केले जाते.
अशा या मागास आणि पुसट विचारांच्या विचारसरणीला मूठमाती देऊया. कारण शेवटी आपणही याच क्रांतीज्योती सावित्रीबाई च्या मुली आहोत ना पण म्हणतातच की
नारी जीवन झूले की तरह
इस पार कभी उस पार कभी
कारण साक्षात परमेश्वराने सुद्धा हे मान्य केले आणि त्यामुळेच महिषासुराचा वध करण्यासाठी आदि मायला पाचारण केले. निसर्गाने स्त्रीला सहनशिलतेचे वरदान दिले आहे म्हणूनच या सहनशीलतेला अन्यायात रूपांतरित होऊ देऊ नको.
अन विसरू नको याच क्रांतीज्योती च्या पाऊलवाटेवर प्रवास करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांसारख्या करारी आणि निश्चय ज्वालेला.
कदाचित सावित्रीही ओरडून सांगत आहे तुमच्यासाठी मी माझं कर्तव्य बजावलं त्याला तू मूर्तरूप आणल्यास पण स्वतःला मात्र तू एखाद्या मुखवट्या प्रमाणे रंगवलं, जो मुखोटा हा केवळ इतरांचा समाधान करतो. काढून फेका कृत्रिमतेचा चेहरा आणि जग मनसोक्त, मनमुराद स्वतःला नेहमी प्रवाही ठेव. संपवू नको स्वतःला संपवून टाक अन्यायाला.
आता एक शेवटचं सांगते माझी जयंती सोहळे करण्याऐवजी तळागाळात अन्यायाने बुडणार यांना भक्कम आधार दे कारण
बुडती हे जन न देखे डोळा
येतो कळवळा म्हणून या
अशांचा आधार हो तीच माझी खरी जयंती.
सौ. भाग्यश्री नरहरराव लालवंडीकर -जोशी. कंधार.