कंधार ;
आजची महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे व शिक्षणाचे त्यांच्या पवित्र कार्यामुळे माझ्यासह असंख्य महिला सक्षम झाल्या असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ उषा कागणे यांनी बालिका दिन कार्यक्रमात आज तीन जानेवारी रोजी प्रतिपादन केले.
कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह्या बोलत होत्या. यावेळी वर्ग प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमास पालक प्रतिनिधी सुनील पाटील डफडे, मुख्याध्यापक वाघमारे डी.जी. शिक्षक आगलावे आनंदा , राजु केंद्रे , बालकताई चंद्रकला तेलंग यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती . यावेळी सई माधव भालेराव या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केली होती .
