फुलवळ (धोंडीबा बोरगावे)
भारतीय स्त्री शिक्षणाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त फुलवळ ता.कंधार येथे सावित्रीच्या लेकीकडून अंगणवाडी केंद्रात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांना सोबत घेऊन अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनीस यांनी स्त्री उद्धाराच्या महामेरू , स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती शोभाबाई डांगे , गोरिबी शेख , संगीता जोंधळे , सुभद्राबाई फुलवळे , वंदना मंगनाळे , मदतनीस सुनीता चौंषस्टे , कालिंदाबाई गोधने , नंदिनी बसवंते , महानंदा बसवंते यांच्यासह चिमुकले बालक उपस्थित होते.