कंधार
ग्रामीण रुग्णालय कंधार येथे 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्याना लसीकरणाची सुरवात करण्यात आली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली कंधार न्यायालयाचे न्यायाधीश सळगरकर साहेब यांच्या हस्ते 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्याचे लसीचे उद्घाटन करण्यात आले 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थी मुली मधून 15 वर्षाच्या कु. साक्षी नागोराव श्रीमंगले या लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला .व त्यांना
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
याप्रसंगी कंधार न्यायालयाचे न्यायाधीश सलगरकर साहेब यांनी लसीकरणासाठी आमचा पाठिंबा यावेळी बोलताना सांगितले. तसेच शिवाजी हायस्कूल चे उप प्राचार्य सदानंद कांबळे सर यांनी सांगितले की 100% लसीकरण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो असे यावेळी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमास उपस्थित न्यायालयाचे न्यायाधीश अतुल सलगरकर साहेब व त्यांचा सर्व स्टाफ व तसेच शिवाजी हायस्कूलचे उपप्राचार्य श्री.सदानंद कांबळे सर व कंधार शहरातील मुख्याध्यापक श्री.सुदर्शन पेठकर सर प्रियदर्शनी हायस्कूल कंधार ,श्री.गित्ते सर महात्मा फुले हायस्कूल ,श्री. कदम सर श्री.शिवाजी विद्या मंदिर हत्तीपुरा कंधार येथील शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.
तसेच कंधार ग्रामीण रुग्णालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली व कंधार न्यायालयाचे न्यायाधीश श्री अतुल सलगरकर सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी ग्रामीण कंधार ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस आर लोणीकर सर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. महेश पोकले दंत शल्यचिकित्सक तसेच डॉ.संतोष पदमवार ,डॉ.श्रीकांत मोरे व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी पार्वती वाघमारे, ज्योती तेलंगे ,प्रशांत कुंमठेकर ,
श्री. विष्णुकुमार केंद्रे औषध निर्माण अधिकारी यशवंत पदरे ,श्री .दिलीप कांबळे,सर्व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यावेळी बोलताना सांगितले की कंधार येथील सर्व सर्व लाभार्थ्यांना मास्क सँनिटायझर सोशल डिस्टन्स घेऊन सहकार्य करावे आणि हो मिक्रोन सारख्या व्हेरीयंटला न घाबरता 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांनी लस करून घ्यावे असे आव्हान कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस आर लोणीकर यांनी बोलताना सांगितले.