कंधार
ज्या माऊलीने मुलींना शिक्षण देण्यासाठी स्वतःचे प्रयत्न पणास लावले.घरा कडून शाळेत मुलींना शिकविण्यासाठी जाता-येता धर्ममार्तंडाचा अपमान सहन करत आपली जिद्द पणास लावून पतिश्वर ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेतून हिंमतीने नारीशक्तीस ज्ञानदान करण्याचे पवित्र कार्य ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांनी केले.आज 3 जानेवारी 2022 हा जयंती दिवस बरोबर 190 वर्ष झाली या क्रांति माऊलीचा जन्म होवून आजही त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व कार्यक्रम सुत्रसंचलन ते आभार प्रदर्शन नारीशक्तीने करुन एक अनोखे विनम्र अभिवादन जयंती निमित्त शाळेने केले.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्युनियर विभागातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका सौ.विद्याताई फड यांनी भुषविले.प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका रईनुसा मॅडम,प्राध्यापिका सौ.सुरेखा पवार मॅडम, प्राध्यापिक ऊबाळे मॅडम, सौ.सुमित्रा सुरेशराव धोंडगे मॅडम, सौ.अंजली कानिंदे(मुनेश्वर) मॅडम, सौ.संगीता वडजे मॅडम, सौ.चिंतेवार मॅडम, या सर्व नारीशक्ती गुराखी पिठावर उपस्थित होत्या.
वंदे मातरम राष्ट्रीय गीताने सुरुवात होवून छ.शिवाजी महाराज, मातोश्री मुक्ताई धोंडगे,सावित्रीबाई फुले,म.बसवेश्वर महाराज, म.ज्योतिराव फुले या आदर्शांना माल्यार्पण करुन अभिवादन केले.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ग्रंथपाल दत्तात्रय एमेकर यांच्या दिग्दर्शन लेखनातून इयत्ता दहावी सेमि वर्गातली कु.श्रीया छाया अंगदराव सुकणे या मुलीने ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब व्यक्तीरेखा साकारुन सर्व उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी विद्यार्थीनी कु. श्रीया सुकणेचे माता-पिता सौ.छाया अंगदराव सुटणे आणि अंगदराव सुकणे आणि पत्रकार दैनिक भास्करचे विपुलजी बोमनाळीकर व उद्याच्या मराठवाडाचे मुरलीधरजी थोटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक दहावी वर्गातली विद्यार्थ्यानी कु.आर्या नरेंद्रजी राठोडकर केले तर उत्कृष्ट सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन दहावीत शिकणारी विद्यार्थ्यीनी कु.दुर्गा रुंजे अन् कु.शुभांगी जर्नाधन केंद्रे हीने केले.
अध्यक्षीय समारोप व मार्गदर्शनपर विचार मांडतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापिका सौ.विद्याताई फड यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्या ओजस्वी वाणीतून प्रकाश टाकत, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आम्ही वावरतो आहोत.प्रत्येक नारीने सावित्रीबाई सारखे खंबीरपणे वागले पाहिजे!सावित्रीबाई विचाराची ज्ञानाची ज्योत प्रत्येक नारीशक्तीत पेटलीच पाहिजे.असे मौलीक विचार मांडत कार्यक्रमात जणुकांही उर्जाच भरून उपस्थिता नारीशक्तीची मने जिंकली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यास मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर, उपमुख्याध्यापक डी.पी.कदम सर, पर्यवेक्षक रमाकांत बडे सर व तुकाराम कारागीर सर उर्दू विभाग प्रमुख हिदायत बेग सर यांचे सहित प्रा.संभाजीराव वडजे,प्रा.अशोक वरपडे, प्रा.शरद शेटे, प्रा.बामणे सर,प्रा.संग्राम कौसंल्ये, प्रा.अक्कनगीरे प्रा हासूळे,
अनंदराव भोसले,वैभव कुरुडे भास्कर आकुलवाड, संदीपकुमार कांबळे,गंगाराम खुडे,सुरेश घोरबांड,उमाकांत चिवडे सर,सुरेश इरलवाड सर सौरभ कदम,योगेश रणभिडकर,प्रा.मुनीर सर,प्रा.अफसर,गुलाम मामु ,ऊल्हास राठोड, सफदर पठाण, विशाल पेठकर, चंद्रकांत मोरे,आदींची उपस्थिती होती.