अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
वसंतराव नाईक ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एन डी राठोड यांची नुकतीच राष्ट्र सेवा दलाच्या अहमदपूर तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मिथुन सायकल मार्ट येथे पार पडलेल्या या छोटेखानी सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ह भ प संजय महाराज नागपर्णे तर प्रमुख पाहुणे म्हणून गांधी अभ्यासक भागवत येनगे आणि हरिदास तम्मेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्र सेवा दलाच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक परवा दि १९ फेब्रु २२ रोजी उदगीर येथील साने गुरुजी स्मारक विद्यालयात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ बी टी लहाने सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिगांबरराव बुरसपट्टे गुरुजी होते.अँड प्रदिप पाटील निरिक्षक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प पु साने गुरुजींच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करण्यात आले.
अत्यंत खेळीमेळीच्या या बैठकीत राष्ट्र सेवा दलाच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यातलातूर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्राचार्य डॉ बी टी लहाने सर यांची निवड करण्यात आली. तर लातूर जिल्हा संघटकपदी प्रा बबनराव पवार सर यांची निवड करण्यात आली. उदगीर तालुका कार्याध्यक्षपदी संदीप दशरथराव नकाशे सरांची निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या अहमदपूर तालुका कार्याध्यक्षपदी एन डी राठोड यांची निवड करण्यात आली. प्रत्येकांची ही निवड पुढील तीन वर्षासाठी आहे.
या बैठकीत अहवाल वाचन क्रष्णा स्वामी यांनी केले. प्रास्ताविक दिगांबर बुरसपट्टे गुरुजी यांनी केले. सुत्रसंचालन अंकुश गायकवाड यांनी तर आभार पुनम घोगरे यांनी मानले.
दरम्यान या निवडीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी एन डी राठोड यांचा सत्कार केला आहे. तर प्राचार्य डॉ बी टी लहाने सरांचे भ्रमणध्वनी वरुन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सत्काराच्या या कार्यक्रमास मिथुन सायकल मार्टचे नाजीम भाई, अहेमद तांबोळी, विषयतज्ञ बिल्लापटे सर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, कांबळे एल डी, मधुकरराव जोंधळे ,नवोदित कवी विजय पवार आणि प्रा भगवान आमलापुरे यांची उपस्थिती होती.