आज 6 मार्च 2022 रोजी मा.पत्रकार माधव रामू गोटमवाड यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने निर्भीड व धाडसी व्यक्तीमत्वाच्या जीवन कार्यावर टाकलेला हा शब्द प्रकाश…
‘
पत्रकार म्हणजे केवळ हातात बूम माईक आणि प्रेस कार्ड दाखवीत फिरणे नव्हे,ब्रेकिंग न्यूज कधी मिळेल याचा अंदाज नसतो, त्यामुळे झोपेतून ही जागे व्हावे लागते आणि नि:पक्षपाती पणे विचार करण्याची क्षमता, विश्वासार्हता महत्त्वाची असते. अश्या ह्या व्यक्तिमत्त्वाचा जन्म 6 मार्च 1996 रोजी आई लक्ष्मीबाई व वडील रामू यांच्या पोटी संगमवाडी येथे झाला,
कंधार तालुक्यातील संगमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचे शिक्षण झाले नंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मनोविकास कॉलेजमध्ये झाले ,त्यानंतर पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण शिवाजी कॉलेज कंधार येथेच झाले , संगमवाडी या गावच्या भूमिपुत्रांने परिस्थिती संघर्ष करून शैक्षणिक वातावरण अनुकूल बनविले ,लहानपणापासूनच वाचन व लेखन करण्याची त्यांना आवड होती. सुरुवातीस त्यांनी ‘युवाराज्य’ न्यूज मधून आपल्या लेखन कार्याचा शुभारंभ केला, त्यानंतर त्यांच्या बौद्धिकक्षमते नुसार त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून कार्य केले.
देशसेवा करीत असते वेळी शहीद झालेले बाचोटी येथील जवान बालाजी डुबूकवाड यांच्यासाठी स्मारक उभारले पाहिजे, ही मागणी त्यांनी सर्वासमोर मांडली त्यांच्या या मागणीला यश मिळाले, संपूर्ण समाज त्यांच्या पाठी मागे उभा होता कारण कधीही सत्याचाच विजय होत असतो,
यांची प्रचिती या घटनेनंतर आली,
सध्या माधव गोटमवाड हे दैनिक चालू वार्ताचे कंधार तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत ,
थोड्याच दिवसात त्यांनी तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे, गोरगरिबांच्या प्रश्नांची त्यांनी नेहमीच दखल घेऊन त्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे , अनेक अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन समाजासाठी त्याचा काय उपयोग करून घेता येईल याची जागृती समाजात केलेली आहे,
ग्रामीण भागातून येऊन माधव गोटमवाड यांनी शहरात कोणत्या सुधारणाची आवश्यकता आहे, हे ओळखून त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेशी संपर्क करत आहेत ,त्यामुळेच आज ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
वर्तमानपत्र चालवण्यासाठी जे काही वैचारिक लेख , संपादकीय लेख, जनरल नॉलेज, विविध वनस्पतींची माहिती ,क्रीडा विषयक माहिती ,
ताज्या बातम्या ,शब्दकोडे, याची माहिती करून घेत आहेत,यासाठी अहोरात्र श्रम करून चांगल्या पद्धतीने पत्रकार म्हणून त्यांचे कार्य चालू आहे. अशा या गुणी पत्रकारांच्या व्यक्तिमत्त्वावर आपण दोन शब्द लिहावेत म्हणून मी हा शब्दप्रपंच केलेला आहे.सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये पत्रकार होणे म्हणावे तसे सोपे राहिले नाही, कारण वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो ,पत्रकारिता म्हणजे सत्याचा शोध घेणे होय? त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले चौफेर ज्ञान असणे अतिशय महत्त्वाचे आहे. याची जाणीव माधव गोटमवाड यांना झालीच आहे.
त्यांनी यापुढील काळामध्ये सुद्धा दर्जेदार लेखन करावं!
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।। तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेची जाणावा ।।
असे म्हणतात
आपल्या देशात अशिक्षित, गरीब, अज्ञानी समाज आहे ,गरिबी हे दुष्टचक्र आहे ,ती घालवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा विचार करून पुरोगामीत्वाकडे समाजातील लोकांची वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात,नेहमी सकारात्मक कार्य आपल्या हाती घेऊन पूर्णत्वास नेतात , कोरोनाच्या काळात कितीतरी कुंटुबाची त्यांनी काळजी घेतली आहे,आपला जास्तीत जास्त वेळ समाज कार्यासाठी घालवतात,
गुरुकुल शाळेमध्ये शिक्षक म्हणून ही कोरोनाच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचे कार्य केलेले आहे,
सर्वत्र शाळा ऑनलाईन पद्धतीने चालत असताना सुद्धा काही विद्यार्थ्यांना घेऊन कोरेनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालूच ठेवलेले आहे, समाजासाठी धडपड करणारा हा पत्रकार खरोखरच उल्लेखनीय आहे असे म्हणता येईल,
बेरोजगारांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न व्यसनमुक्ती, पर्यावरणीय समस्या, हुंडाबंदीसाठी प्रयत्न, समाजातील निरक्षरता कमी करणे, समाजासाठी आवश्यक असणाऱ्या घटनावरच सखोल लेखन करताना दिसतात, महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाऊन त्या ठिकाणचं वार्तांकन करतात, तसेच अनेक कार्यक्रमाला हजेरी लावतात, म्हणूनच समाजाला जागृत करणारे व्यक्तीमत्व म्हणजेच माधव गोटमवाड होय.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,
त्यांच्या सारखे अनेक समाजाभिमुख पत्रकार तयार झाल्यास समाज, व देश उन्नतीच्या दिशेने वाटचाल करेल. यात शंका नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
साहित्यिक प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड