मुखेड – मायबोली मराठी परिषद मुखेडच्या वतीने कवी चंद्रकांत गायकवाड यांच्या अभंग समतेचे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा उत्कृष्ट शिक्षक( ग्रामीण)हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांचा सन्मान सोहळा अस्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन दि. १० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता जिजाऊ ज्ञान मंदिर,मुखेड येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड हे असणार आहेत तर उद्घाटक म्हणून मुखेड- कंधार विधानसभा परिक्षेत्राचे सन्माननीय आमदार डॉ. तुषारजी राठोड यांची उपस्थिती राहाणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, ज्येष्ठ साहित्यिक दा.मा.बेंडे,ज्येष्ठ साहित्यिक तथा नरहर कुरुंदकर पुरस्कार प्राप्त देविदास फुलारी,ज्येष्ठ समिक्षक प्रा.डॉ. नरसिंग वाघमोडे, कथाकार प्रा.डॉ.शंकर विभुते आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेंव्हा वरील कार्यक्रमास मुखेड व परिसरातील साहित्यिक श्रोते बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मायबोली परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख गजानन गेडेवाड,गणगोत प्रकाशन देगलूरचे सर्वेसर्वा पांडुरंग पुठेवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.