फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
या सामान्य-ज्ञान स्पर्धेत इयत्ता ४ थी ते ७ वी (छोटा गट) इयत्ता ८ वी ते १२ वी (मोठा गट) अश्या दोन गटांमध्ये ही परीक्षा श्री बसवेश्वर महाविद्यालयात घेण्यात आली होती. या शिवचरित्र व सामान्य ज्ञान स्पर्धेत एकूण २०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता , आज ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ येथे या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक तथा तंटामुक्ती अध्यक्ष धोंडीबा मंगनाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य चंदबस मंगनाळे, प्रविण मंगनाळे, कामन मंगनाळे, डॉ. दिनेश रामपुरे, श्री बसवेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूराव मंगनाळे, फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर डांगे , सचिव दिगंबर डांगे, पत्रकार विश्वंभर बसवंते, उमर शेख, पांचाळ सर, चंद्रकांत मंगनाळे,विठ्ठल बोरगावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष म्हणजे या बक्षीस वितरण सोहळ्या मध्ये फुलवळ येथील नौसेना दल ( इंडियन नेव्ही ) मध्ये दाखल झालेले सुरज होणराव आणि गुंडप्पा मंगनाळे या भारतीय जवानांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या शिवचरित्र व सामान्य ज्ञान स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम बस्वराज बसवंते, द्वतिय शिवानी मंगनाळे, तृतीय श्रद्धा साके, तर लहान गटात प्रथम शिवम आमलापुरे, द्वतीय श्रेया केंद्रे, तृतीय किशोर आमलापुरे यांनी बाजी मारली . तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन बसवंते, गोविंद माने, विलास सोमासे, आदित्य देवकांबळे, विनायक पोतदार, प्रकाश देवकांबळे, मारोती फुलवळे, शुभम फसमल्ले यांनी परिश्रम घेतले.