अहमदपूर : प्रा भगवान आमलापूरे
१६ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दि ०६ मार्च २२ रोजी येथील शासकीय विश्रामग्रहात बैठक पार पडली. बैठकीस संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा डॉ अंजुम कादरी उपस्थित होत्या.
चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते श्री मच्छिंद्र गोजमे सरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रा गोविंदराव शेळके, डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, वाय डी वाघमारे गुरुजी, श्री हरिदास तम्मेवार सर, नाना कदम, सौ मनोरमा जाधव,
दत्तात्रय कदम ,माजी प्राचार्य तुकाराम हरगिले, विद्रोही कवी अंकुश सिंदगीकर, राजीव पाटील, डॉ अकबर लाला, कवी मुरहारी कराड ,शिवाजी नामपल्ले ,भगवान बामणे, भगवान आमलापुरे आणि इतर मान्यवर दिसत आहेत.