कंधार ;
कौठा व शिराढोन सर्कलमधील कार्यकर्त्यांचा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या आढाव्या संदर्भात “कौटुंबिक स्नेह संवाद मेळावा” चिखली ता. कंधार येथे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दि६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे यांनी दिली.
यावेळी बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष देविदास भाऊ राठोड ,जिल्हा सरचिटणीस श्रावण भाऊ भिलवंडे,जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा सौ प्रणिताताई देवरे चिखलीकर ,

सरचिटणीस डॉ. माधवराव पाटील,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख भाजपाचे ज्येष्ठ नेते वारकड गुरुजी ,सचिन पाटील चिखलीकर, भाजप पक्षाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव नाईक ,भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, यांच्यासह शिराढोन आणि कौठा सर्कलचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
