जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी कंधार येथे विविध क्षेत्रातील नारीरत्नांचा होणार गौरव.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

       मन्याड खोरे म्हटले की नवनिवीन उपक्रम साकार करणारा ऐतिहासिक परिसर म्हणून सर्वत्र ओळखला जातो.  उद्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक नाना ऊर्फ रविकांत चिवळे यांच्या वाढदिवसानिमित्त  विविध क्षेत्रातील त्यात सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , कामगार , बचत गट , वैद्यकीय, कला, क्रीडा, प्रबोधन, व्यावसायिक अशा एकूण १० क्षेत्रात संघर्षमय जीवन जगत आपल्या खडतर जीवनाला हसत-हसत स्विकारुन या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..  मंगेश पाडगावकर यांच्या कवनासम जीवन जगणाऱ्या नारीशक्तीस नारीरत्न गौरव सन्मापुरस्कार २०२२ देऊन कंधार येथे जागतिक महिला दिनी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.


      हा पुरस्कार वितरण सोहळा  नुकतेच भारत मातेची सेवा पुर्ण करुन आपल्या स्वगृही सेवानिवृत्त होवून आलेले माजी सैनिक नाना ऊर्फ रविकांत चिवळे मानसपुरीकर यांच्या संकल्पेतून आयोजित करण्यात आला आहे . योगायोगाने आठ मार्च ही तारीख म्हणजे त्यांचा जन्म दिवस , तेंव्हा जन्मदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देवून तो खर्च "जीवन एक संघर्ष हैं" म्हणुन जीवन जगत आपल्या कुटुंबास सन्मानाने जीवन जगण्यास आधार देणाऱ्या नारीशक्तीचा गौरव करण्याचा मानस त्यांनी ठेवला त्यावरून हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे असे माजी सैनिक नाना चिवळे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले . तसेच यापुढेही दरवर्षीच माझा वाढदिवस नारीशक्तीचा सन्मान करुन समाजात एक ठळक कार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.



    सदर पुरस्कारासाठी १) विरपत्नी पुरस्कार साठी -- कोमल हणमंतराव काळे उस्मानगर , शीतल संभाजी कदम जानापुरी , अर्चना बालाजी डुबुकवाड बाचोटी २) नारीरत्न पुरस्कार साठी-- गोकर्णा माधवराव विभूते ( बचतगट ) , पार्वतीबाई दिगंबरराव वाघमारे ( वैद्यकीय ) , वंदना रामराव होणराव फुलवळकर ( सामाजिक व संघर्षमय जीवन ) रेखा गोरडवार ( पत्रकार ) , रसीदाबी शेख मोईन ( स्वच्छतादूत ) , वसीमा महेबूब शेख , संचला माधवराव गुंडे ( आरोग्यसेवा )  अशा विविध क्षेत्रातील एकूण १० कर्तबगार महिलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

   हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या ता. ८ मार्च रोजी दुपारी १:०० वाजता नगरेश्वर मंदिर मंगल कार्यालय कंधार येथे संपन्न होणार असल्याचे आयोजक नाना ऊर्फ रविकांत चितळे , योग शिक्षक निळकंठ मोरे , सुंदर अक्षर शाळेचे दत्तात्रय एमेकर , गंगाप्रसाद यनावर , शंतनू कैलासे यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *