कंधार
पाताळगंगा उमरज दगडसांगवी या रोडचे काम सुरू झाले असून गुत्तेदाराचा परवाना रद्द करून सदरील काम करणाऱ्या एजन्सी ला ब्लैक लिस्ट मध्ये टाका अशी मागणी माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केली होती त्या मागणीला यश आले असून आज शुक्रवार दि. 11 मार्च रोजी काम सुरू केले असल्याची बालाजी चुकलवाड यांनी दिली.
पाताळगंगा उमरज दगडसांगवी या रोडचे काम अपुरे व बोगस झाले म्हणून माजी सैनिक संघटनेच्या वतीने बांधकाम विभाग जि.प.उपविभाग कंधार च्या कार्यालया समोर उपोषण केले होतो.त्या वेळी जि.प.बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन दिले होते.

देर आये दुरुस्त आये या प्रमाणे ते आश्वासन पुर्ण करण्यासाठी आज परत काम सुरू केले त्याबदल माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे