पडद्यामागून राजीकय व सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेला युवा नेता शिवराज पाटील धोंडगे

कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघतील राष्ट्रवादी काँग्रेसचा बुलंद आवाज तथा शेतकऱ्यांचे नेते माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांचे जेष्ठ चिरंजीव शिवराज पा. धोंडगे यांचे मतदारसंघात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात योगदान असते. या मध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वेळोवेळी सहकार्य करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शंकर अण्णा यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत दोनवेळा आणि माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांच्या जि. प. निवडणुकीत शिवराज पा. धोंडगे यांनी उत्कृष्ठ मोर्चेबांधणी केली होती. वडील व भाऊ यांच्या निवडणुकीत ते पडद्यामागचे खऱ्या अर्थाने सूत्रधार होते.


शिवराज पा. धोंडगे यांना कंधार लोहा विधानसभा मतदार संघातील राजकीय जान आहे. तसेच ते सामाजिक कार्यात सदा कोणत्यानाकोणत्या रूपाने सामाजिक कार्यात भाग घेत असतात. तसेच गोरगरिबांना संकट काळात त्यांनी अनेक वेळा, अनेक गावांत आर्थिक मदतीचा हातही दिला आहे. कोरोना काळात राष्ट्रवादी कांग्रेसकडून शहर व परिसरात गरजूंना मोठ्याप्रमाणात मदत करण्यात आली. यात शिवराज पा. धोंडगे यांची भूमिका महत्त्वाची होती. कोरोना बाधित रुग्ण असो की त्यांचे नातेवाईक असो त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना धान्य वाटप करण्यात आले. शिवराज पा. धोंडगे यांना विकासाची जान आहे. वडील शंकर अण्णा यांच्या मुशीत राहून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले आहेत.


मतदारसंघातील युवकात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करण्याचे कामही त्यांनी खुबीने केले आहे. तरुणांची मोट बांधून त्यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीला संजीवनी देण्याचे काम केले आहे. अल्पकाळातच विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले आहेत. मधल्या काळात राष्ट्रवादीवर आलेली मरगळ दूर करण्यासाठी ते अग्रेसर असून राष्ट्रवादीला अधिक बळकट करण्यासाठी ते तरुणांना सोबत घेत जुन्या कार्यकर्त्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येणाऱ्या जि. प. निवडणुकीत ते आपली राजकीय इनिंग सुरू करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असून त्यांनी जि. प. निवडणूक लढवली तर नक्कीच यश मिळणार या बाबत कोणाचेही दुमत राहणार नाही. शिवराज पा. धोंडगे हे कंधार लोहा मतदारसंघातील एक उभरते नेतृत्व असल्याने त्यांना येत्या काळात राजकीय क्षेत्रात त्यांचा सुवर्णकाळ आहे.

शरद पाटील भागानगरे
विधानसभा अध्यक्ष

राष्ट्रवादी युवक कांग्रेस

कंधार लोहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *