कंधार ; प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियान 2022 अंतर्गत गावोगावी जाऊन सदस्य नोंदणीचे उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांचा नांदेड़ येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नांदेड जिल्हा सह प्रभारी सौ. अर्चनाताई राठोड यांच्या हस्ते दि.23 मार्च रोजी सत्कार करण्यात आला.
आखील भारतीय काँग्रेस कमीटीच्या वतीने सबंध देशभर काँग्रेस पक्षाच्या वतीने डीजीटल सदस्य नोंदणीअभियानास सुरुवात झाली असून देशाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुलजी गांधी, महाराष्ट राज्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले , राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आवाहना नुसार व आमदार अमरनाथ राजूरकर ,जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात सदस्य नोंदणी काम प्रभावीपणे चालू आहे.
या आवाहना नुसार डिजीटल सदस्य नोंदणी अभियानात लोहा मतदार संघात सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी सक्रीय सहभाग नोंदवत गोवोगावी भेटी देवून सदस्य नोंदणी करत या अभियानास गती दिली आहे.
सौ. वर्षाताई भोसीकर यांचे जिल्ह्यात महिला मध्ये प्रभावी काम होत असल्या बद्दल कार्याची नोंद घेऊन जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालय नांदेड येथे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नांदेड जिल्हा सह प्रभारी सौ.अर्चनाताई राठोड, काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांना सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ. वर्षाताई भोसीकर यांनी सदस्य नोंदणी अभियान यापुढेही ३१ मार्च पर्यंत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नांदेड जिल्हा सह प्रभारी सौ.अर्चनाताई राठोड, काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव मामा शिंदे नागेलीकर यावेळी सरचिटणीस उमाकांत पवार, कृष्णाभाऊ भोसीकर,हरजन्दरसिंह संधू ,मनमत मेळगावे आदीची यावेळी उपस्थिती होती.