कंधार मुखेड राज्य मार्ग बनला प्रवासासाठी डोकेदुखी ; रखडलेले कामासाठी प्रशासनाने पुढाकार घेवून मार्गी लावावे – भाजपा कार्यकर्ते अमोल देशपांडे यांच्या सह प्रवाशांची मागणी

कंधार वार्ताहर


कंधार शहराजवळून एक राष्ट्रीय मार्ग व एक राज्यमार्ग गेला आहे. राष्ट्रीय मार्गाचे काम जवळपास पूर्ण होऊन सुरळीत वाहतूक चालू आहे. काही गावाजवळ थोडफार काम राहिले आहे. पण दुसरा राज्यमार्ग कंधार वरून अंबुलगा मार्ग मुखेडला जाणारा हा मार्ग प्रवासासाठी डोकेदुखी ठरला आहे.


हा राजमार्ग जवळपास दोन ते तीन वर्षापासून रखडला आहे. आंबुलगा गावाच्या पुढून ते सावरगाव पर्यंत अंदाजे चार किलोमीटरचा रस्ता तीन वर्षापासून रखडला आहे. या मार्गावर प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. हा जो चार किलोमीटरचा भाग येतो तो वन खात्याच्या परिक्षेत्रात येत असल्यामुळे वनखाते व सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये जवळपास तीन वर्षापासून प्रस्ताव त्रुटीमध्ये निघत आहे. आजवर नागरिकांना असे वाटत होते की हा मार्गावर न्यायालयीन प्रकरण आहे. पण या मार्गावर कोणतेही न्यायालयीन प्रकरण नाही. वन विभागाच्या वतीने केंद्र शासनास वन विभागाकडून रस्ता मोठा करीत असताना परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी घेत असताना सदरील गुत्तेदार व बांधकाम विभागाकडून वन विभागात सादर करत असलेल्या प्रस्तावात सतत त्रुटी येत असल्यामुळे हा रस्ता गेल्या दोन-तीन वर्षापासून रखडला आहे.

सदरील रस्ता रखडल्यामुळे मुखेड व कंधारला प्रवास करताना देव दिसत आहेत. रस्त्यावर मोठमोठे दगड, गिट्टी, माती उघडी पडल्याने वाहन चालकास वाहन चालवताना खूप मोठी कसरत करावी लागत आहे.
हा जो रस्ता आहे वन खाते म्हणत आहे सार्वजनिक विभागाच्या चुकीमुळे राहिला. सार्वजनिक विभाग म्हणत आहे वन खात्याच्या चुकीमुळे राहिला. हा विषय सामान्य माणसाला समजण्या अलीकडचा आहे. विद्यमान लोकप्रतिनिधीला तर या रस्त्याचे काही देणे-घेणे नाही असं वाटत आहे.

*आमचा तालुकाच कंधार असल्यामुळे कंधारला ये जा करत असताना हा रस्ता खराब झाल्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बऱ्याच शारीरिक समस्या जडत आहेत. – रामकिशन रघुनाथराव केंद्रे देवईचीवाडी

  • मी कर्मचारी असल्यामुळे मला रोज या रोड वरूनच प्रवास करावा लागतो गाडीचा चालक व मालक असल्यामुळे वेळतर लागतोच. माझ्या गाडीचे टायर फुटले व माझी गाडी इतर काम काढत आहे – कर्मचारी युवराज शिंदे.

  • वन खात्याच्या राखीव वनांमध्ये रस्ता जात असून सदरील रस्त्याची केंद्रशासन शासनाची परवानगी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. सदरील प्रस्तावाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम रोखले आहे. तुरटीची पूर्तता झाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी मिळेल. – डी घुगे कार्यालयीन वनरक्षक मुखेड.

  • मंत्रीमहोदयांनी सुद्धा राज्य स्तरावर बैठका घेतल्या आहेत या मार्गासाठी. आंबुलगा ते सावरगाव पर्यंतचा जो रस्ता आहे तो वन खात्यामध्ये येतो. आम्ही वनखात्याला प्रस्ताव सादर केल्यानंतर वेळोवेळी वनखाते त्यामध्ये त्रुटी काढत आहे. इंग्रजीमध्ये प्रस्ताव दिला की मराठीमध्ये द्या. मराठीमध्ये दिला की इंग्रजीमध्ये द्या. प्रस्ताव ऑफ लाईन वाट लावला व ऑनलाइन ही वाट लावला. तर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राहिला नसून हा रस्ता वनखात्याच्या चुकीमुळेच राहिला आहे.
  • जोशी साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कंधार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *