कंधार
राज्यस्तरीय
अबॅकस परीक्षेतील गुणवंताचा प्रबोधनकार ठाकरे शाळेत आज मंगळवार दि १३ एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिह , प्रशस्तीप्रत्र देवून सत्कार केला.
क
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वेश्वर पापिनवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहन मुत्तेपवार , मुख्याध्यापक हरी चिवडे , दिगांबर वाघमारे ,शंतनु कैलासे,
सुभाष मुंडे , अविनाश कदम , शिवसांब देशमुख , भालेराव सर , गौंड सर, भास्कर कळकेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
नैतिक देवकांबळे (राज्यस्तरीय ५ वा),श्रेया अंबेकर (राज्यस्तरीय ६ ) , अद्वेत देशमुख , सोनम टोम्पे , विवेक वरपडे , आदी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिह , प्रशस्तीप्रत्र देवून सत्कार केला. तर अन्ही पापिनवार , समर्थ पापीनवार , कर्तव्य देवकांबळे , आदी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आले.
अश्विनी शिवसांब देशमुख यांनी याबदल सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की संगणक व कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने गणिते सोडविता येतात.पाल्याची एकाग्रता, स्मरणशक्ती,आकलनशक्ती व आत्मविश्वासात वाढ होते. डाव्या व उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. बुध्दीचा व्यायाम होवून बौध्दिक क्षमता वाढते. प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप, मंथन, ऑलंपियाड. इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. हजारो विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला असेअश्विनी शिवसांब देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
पहाडे बडजाते आराधना यांनी कार्यक्रमाचे आभार मानले . या कार्यक्रमासाठी व्यंकटेश ताटे , अंबेकर शिल्पा, वैशाली पापीनवार , रुद्र प्रताप , विशाल शेळके, क्षितीज लुंगारे, ओमकार तेलंग आदीनी परीश्रम घेतले.