मूली म्हणजे घराचं घरपण

     

सुखाचं गोंदण,सामंजस्याची खाण,बापाच्या ह्रदयात असतं तिला मानाचं स्थान.मुलीच्या आगमनाने आई तर सुखावतेच पण बाप देखील आनंदाने मनसोक्त डौलतो.

तिच्या बाल लीला पाहातांना प्रत्येकक्षण फुलपंखी होऊन घरभर पाखरागत भिरभिरतो.तिच्या ओठातील बोबडे बोल अमृतासम पाझरतात.तिची किलबिलाट घरट्यात आनंदोत्सव पेरते.समाधानाने मन तृप्त होत,कोणतीही मूलगी बापाची फार लाडकी असते.

ती त्याची आई होऊन काळजी घेते.बापाची माया कळत नाही  अस म्हणतात,पण…लेकीला मात्र जाणवते

.”l am proud of my daughter”

असे जेव्हा कोणताही बाप आपल्या लेकीसाठी म्हणतो ना तेव्हा लेकीचा ऊर अभिमानाने भरून येतो.मुलगी ही संसार वेलीवर ऊमलेली एक हसरी गोजरी अबोल कळी असते जी आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा माहेरच्या अंगणात कायमस्वरुपी कोरुन सासरी आनंदाची ऊधळण करते,अस म्हणतात की…खरचं,भाग्यवान आहेत ते,ज्यांना मुली आहेत,म्हणून तीचा मन;पुर्वक आदर करा.ज्या घरात मुलीचा सन्मान होतो त्या घराला सूखसमृध्दी,समाधान लाभत.

          असं म्हणतात की आई एवढी माया बापाला नसते?पण…त्याच बापाला एकातांत लहान लेकरासारखं रडतांना बघा,त्याच्यासाठी लेक काय असते?लेकीच्या आठवणींनी तोही अस्वस्थ असतो.म्हणूनच सासरी राहा-या लेकीला नित्य नियमाने बापाचा फोन हमखास येतो.”बेटा कशी आहेस?”या प्रश्नानी त्याच्या डोळ्यात पाणी दाटत.

वर आलेला हूंदका दाबत तो लेकीला म्हणतो…’काळजी घे स्व;ताची आता आई नाही जवळ’आणि लेक काय समजायचे ते समजते.काप-या आवाजात ती बापाला म्हणते”बाबा आता माझी काळजी करु नका…लग्न झालय माझं.आठवणं येताच क्षणी तुमचं पाखरु येईल की तुमच्या भेटीला…औषध घेत जा वेळेवर,आणि जेवणहीवेळेवर करत जा…

आई खुप काळजी करते तुमची,तीला  मात्र तुम्ही जपत जा…बाप-लेकीच्या डोळ्यात आश्रू दाटलेले असतात…पण,समजुतीचा हळवा स्वर ओठांमधून थरथरतो.काळजात दडलेल बापाचं प्रेम आता मात्र डोळ्यातून पाझरतं…

कोण म्हणत बापाला रडताच येत नाही,लेकीचा फोन ठेवतांना बघा त्याच्या गहिवरलेल्या शब्दांना कधीच वाचा फूटत नाही…अरे…त्याच्याही  काळजात असतो दडलेला प्रेमाचा अथांग झरा…

सासूरवाशिण  लेकीला बोलतांना त्याचा बांध असतो फूटलेला..लेकीलाच कळतात त्याच्या मनातल्या भावनां…म्हणूनच घराघरात असावी एक छोटीसी परी,आनंदाचे क्षण मग सजतील दारी.            लेकीचा जन्म म्हणजे ऊत्सव असतो नात्यांचा..

.एकमेकांत गुंतलेल्या हळव्या प्रेमाचा.

rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्यनांदेड9860276241

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *