कोरोना तू बर नाही केलसं.
कोरोना तू बर नाही केलसं.
अस्पृश्यता संपली पण..
तुझ्या येण्यामुळ माणसात.
भेदाभेद निर्माण झाली..
जो तो येतोय आणि…
एकमेका प्रश्न विचारतोय..
कोण केंव्हा कोठून आला..
याची खात्री करुन घेतोय..
तुझ्यामुळे आता माणसात
आपलेपणा संपलाय…
मित्रांच्या मैत्रीला सुद्धा..
कोरोना कीडा डसलाय..
प्रत्येकाच्या नात्याला सुद्धा
आता ग्रहण लागलय..
कोरोना काळात मुलगा..
दूर दूर जाऊ लागलाय…
कोरोना खरचं तू नाती…
संपवून रिकामा झालाय..
केवळ तुझ्या भीतीमुळ…
माणूस दूर जाऊ लागलाय.
कोरोना तुझ्या विरोधात..
संस्था-संघटना झटतायत..
पण श्रेय घेण्यासाठी व्यक्ती
एकमेका डिलीट करतायत
कोरोना आता मनापासून..
तुला हातजोडून विनंती..
बास कर आता तुझा खेळ
घे आता तू नक्की विश्रांती.
कोरोना आता कुठ स्पृश्य..
अस्पृश्यता संपली होती..
पण कदाचित तुझ्यामुळे.
ती परत दिसली होती..
कालचा सगा मित्र आज..
तुझ्यामुळ अलग झालाय..
अजुनही खुर्ची मला की ..
तुला कल्ला सूरु झालाय..
जो काहीही करत नाही..
तो श्रेय घेऊ लागलाय..
नवनवीन नियम बनवून..
माणूसकी विसरु लागलाय
कोरोना तुझ्या असण्यामुळ
अधिकारीही पळू लागलाय
केवळ तुझ्या भीतीमुळ..
तो शब्द बदलू लागलाय…
कोरोना तुझ्यामूळ माणूस..
आता शब्द बदलू लागलाय
करणा-या मागे ससेमीर
न करणारा शान्त झोपलाय
म्हणून कोरोना तुला ..
हात जोडून विनंती..
तू जा तुझ्या माहेरी..
घे आता विश्रांती.
*शब्दांकन..
*श्री.यशवंत आ.गायकवाड*
*प्रतिक्षालय दत्तकॉम्पलेक्स*
*रांगोळे कॉलनी करंजेतर्फ..*
*शाहूपुरी, सातारा..*
*मो.नं.१)७९७२७९८४६४..,*
*२)८०८७२६१३५३.!*