वृक्षारोपण करा पर्यावरण वाचवा ; ५ जुन जागतिक पर्यावरण दिन विशेष

जुन जागतिक पर्यावरण दिन

मोहसीन खान
अध्यक्ष

अल ईम्रान प्रतिष्ठान,बिलोली

आजच्या आधुनिक युगात करण्यात येणारी बेसुमार वृक्षतोड यासह अनेक कारणांमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे.आपण ज्या पृथ्वीवर राहतो,वास्तव्य करतो,तिचे रक्षण करणे हि सुध्दा प्रत्येकाची जबाबदारी आहे.त्यासाठी आजघडीला देशातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचा -हास थांबवून संवर्धन केले तरच भविष्यात मानव टिकेल.प्रत्येक व्यक्तीने कमीतकमी एक झाड लावून त्याचे पालनपोषण,जतन व संवर्धन करावे.पर्यावरण विषयी प्रचार प्रसार करण्यासाठी दरवर्षी ५ जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सगळीकडे साजरा करण्यात येतो.


◼️ पर्यावरण हा मुळ शब्द फ्रेंच शब्द environ या शब्दापासून तयार झाला आहे.environ म्हणजे सजीव निर्जिव यांच्यामधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रियामधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.१९६० पासून पर्यावरण हा विषय स्वतंत्ररित्या अभ्यासासाठी येऊ लागला.५ जुन १९७२ ला स्टाॕकहोम येथे बदलते हवामान व आणि पर्यावरण या विषयावर काही देशांनी एकञ येत एक परिषद आयोजीत केली होती.त्यानंतर दोन वर्षांनी ५ जुन १९७४ सालापासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येऊ लागला.त्यानंतर दरवर्षी एक विषय(थिम) ठरवून जगातले जवळजवळ सर्व देश,त्यांची सरकारे,पर्यावणावर काम करणा-या विविध संस्था,संघटना,व्यक्ती त्या विषयावर काम करतात,प्रयत्न करतात.वन अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी झाडांची लागवड तसेच कोणते झाड कुठे लावावे या आवश्यक बाबींचा,गोष्टींचा विचार करुन झाडे लावण्यास सांगीतलेले आहे.यामध्ये जिवनदायी वृक्ष,घराभोवती,मंदिराभोवती,रस्त्याच्या कडेला,रस्त्याच्या दुभाजाकावर,उद्यानात,जलदगतीने वाढणारी,फळझाडे,शेताच्या बांधावर,शेताच्या कुंपनाला,सरपणासाठी,औषधीयुक्त झाडे,वनशेतीसाठी,मातीची सुपीकता वाढवणारी,कालव्याच्या काठाने,बारा तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायु देणारी झाडे,औद्योगिक क्षेञात प्रदुषण निवारण्यासाठी,धुलिकरण व विषारी वायु पासून निवारण,हवेतील प्रदुषण दर्शविणारी झाडे आदि बाबत विचार करुन झाडे लावले पाहिजे.


◼️ आज प्रत्येकाने पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.त्यासाठी सभा,संमेलने,चर्चासञांचे आयोजन करणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धन करणे हि काळाची गरज आहे.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वृक्षलागवड करण्याची जाणीव,त्याचे संवर्धन,पालन पोषण यासाठी आवड निर्माण करावी तसेच घनकच-यावर शास्ञोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे,घातक विषारी वायु गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे,विविध कारखान्यांच्या धुराड्यातून तसेच वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे,स्वच्छता ठेवण्यासाठी लोकांना प्रेरित करणे ई.बाबत प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *