अहमदपुर ( प्रा भगवान आमलापुरे )
वाशीम येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनात लातूर आणि नांदेडकर वक्त्यांनी बाजी मारली.नुकतेच दि २८ आणि २९ मे २२ रोजी गोर साहित्य संघ आयोजित तीसरे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मुख्य विचारपीठावरील एक अख्खे चर्चासत्र लातूर आणि नांदेडकर वक्त्यांनी गाजवलं आणि बाजी मारली. किंबहुना एक अख्खे चर्चासत्रंच त्यांनी हायजॅक केले. असे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.त्याचे एक कारण म्हणजे लातूरकर गोपाळ चव्हाण, अहमदपुरकर एन डी राठोड आणि नांदेडवासी संपादक अविनाश गो चव्हाण इतकेच निमंत्रित वक्ते उपस्थित होते. तर बाकी अर्धेअधिक वक्ते अनुपस्थित होते.
या चर्चासत्राचा विषय , ‘ गोर बंजारात व्रतपत्रांचे समाज प्रबोधनातील योगदान ‘असा होता.यात सत्राध्यक्ष गोपाळराव चव्हाण लातूर आणि एन डी राठोड, अहमदपुर ,होते.भारत पवार, माहिती अधिकारी; अविनाश गोविंदराव चव्हाण, संपादक बंजारा पुकार ; शंकरराव आडे सेवाभुमी; योगेश राठोड, विमुक्त चाळीसगाव; अनिल राठोड, पोहरादेवी दर्शन; जगदीश राठोड, दिग्रस एक्स्प्रेस; गणेश राठोड, पुष्पांजली; सुहास पवार, मेन मराठी;आणि फुलसिंग राठोड, माहिती अधिकारी अमरावती इ मान्यवर निमंत्रित वक्ते होते. पण बंजारा पुकारचे संपादक अविनाश चव्हाण यांचा सन्माननीय अपवाद सोडला तर काही तांत्रिक कारणाने इतर वक्ते या चर्चासत्रास उपस्थित राहू शकले नाहीत.

उलटपक्षी या सर्व मान्यवर वक्त्यांची अनुपस्थिती उपरोक्त लातूर आणि नांदेडच्या वक्त्यांनी भरून काढली.म्हणून गोर साहित्य संघ आयोजित तीसऱ्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनात लातूरकर आणि नांदेडकर वक्त्यांनी बाजी मारली !

सदरील चर्चासत्राचे सुरेख सुत्रसंचालन प्रा ताराचंद चव्हाण, नागपूर यांनी केले तर आभार प्रा दत्ताभाऊ राठोड, पुसद यांनी मानले. यावेळी श्रोत्यांमध्ये आँल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री अमरजीत तिलावत साहेब उपस्थित होते.