खरेपणा शिकायचा असेल शिवसेनेकडून अन खोट्याची कास धरायची असले तर भाजपा
कंधार -ता.प्र. – ५/६/२०२२
कंधार – महाविकास आघाडीचे सरकार कठीण परिस्थितीत ही चांगले काम करीत असताना मात्र भाजपा फालतू गोष्टी कडे लक्ष वेधून विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे.हे मात्र खरे की शिवसेना शब्दाला जागणारी माणसं आहेत. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे राजकारणी नाहीत ते जास्त समाजकारणी आहेत. याउलट मात्र भाजपाची परिस्थिती आहे. ते शब्द मोडण्यात पटाईत आहेत. अन त्यांना जनतेच कुठलचं देणघेण नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी कंधार येथिल मेळाव्यात केले.
‘जागर जनतेचा पोरखेळ भाजपाच्या ढोंगी नेतृत्वाचा’ यामोहिमेअंतर्गत कंधार येथे कै. वसंतराव नाईक सभागृहात शिवसेना मेळाव्यास प्रमुख वक्ते म्हणून उपनेते लक्ष्मणराव वडीले तर उद्घाटक म्हणून संपर्कप्रमुख आनंदराव जाधव,जिल्हा सन्वयक धोंडू पाटील,सहसंपर्कप्रमुख मनोज भंडारी, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर,दतख पाटील कोकाटे, उन्मेश मुंढे,शिवसेना नेते अॅड. मुक्तेश्वरभाऊ धोंडगे,उपजिल्हाप्रमुख बाळू पाटील कराळे, ज्येष्ठ शिवसैनिक गणेश कुंटेवार,कंधार तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव,लोह्याचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रास्ताविक तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव यांनी केले. तद्नंतर बोलताना उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की,खुप संकटे आली तरी महाविकास आघाडीचे सरकार नेटाने काम करत आहे. हे भाजपाला खपत आहे त्यामुळे वीकासावर बोलण्यापेक्षा हनुमान चालीसा सारख्या कामा न धामाच्या विषयावर जनतेचे लक्ष केंद्रित करून मनोरजन करीत आहेत. सतत दुसर्या वेळेस सर्व उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान होतो.शेतर्याना एका दमात कर्जमुक्ती देणारे उध्दवजी ठाकरे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. तर तीच कर्जमाफी फडणीसांनी वर्षेभर करून लाखाच्या मध्ये केली.कुठल्याही बाबतीत खोट बोल पण रेटून बोल ह्या धर्तीवर भाजपाचे सर्व काही चालू आहे. तर शिवसेना संवेदनशील बनत विद्यार्थ्यांनीना मोफत प्रवास व गरीब मुलींचे मोफत लग्न करण्याचे सत्कार्य
शिवसेनाच करू शकते.आज सोमय्या,नवनीत राणा बाई,शेलार,फडविणाची बायको, पडवळ हे मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर बोलतात हे राजकीय दुष्टया भाजपाचे पतन होय असेही शेवटी लक्ष्मणराव वडले हे म्हणाले.
यावेळी संपर्कप्रमुख आंनद जाधव, धोंडू पाटील, मनोज भंडारी, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, मुक्तेश्वरभाऊ धोंडगे, बाळू पाटील कराळे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी संघटक मिलींद पवार,चंद्रकांत पाटील आडगांवकर,पंचायत समिती सभापती प्रतिनिधी पंडीत देवकांबळे,पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण, भिमराव जायभाये, यांच्या सह शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती दिली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कुंटेवार यांनी तर आभार मारोती पंढरे यांनी केले.