ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि औद्योगिक संलग्नता उपक्रम..!

कंधार :- धोंडीबा मुंडे

कंधार तालुक्यातील संगमवाडी येथील ग्रामीण जागरुकता कार्यानुभव आणि औद्योगिक संलग्नता हा उपक्रम पार पडला.
वसंतराव नाईक यांनी कृषी औदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती.

आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याााचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय स्तरावर सर्वत्र साजरा होतो. तर कृृृषी दिन ‘थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ साजरा करण्याची अभिनव प्रथा सन २०११ पासून ‘थेेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ मोहीमेचे प्रणेते एकनाथ पवार यांनी सुरू केली. गाव, तांडा, शहर कार्यालयापासून ते थेेेट बांधावर कृृृषीदिन साजरा केला जातो.


संगमवाडी येथील येथील 01जुलै 2022 रोजी कृषी दिनानिर्मित वृक्षोरपोनाचा कार्यक्रम आयोजित केला होता,
वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरुनगर, ता.कंधार जि नांदेड या कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या (RAWE) च्या विद्यार्थ्यानी अध्यक्ष संजय पवार,मुख्याध्यापक रमेश पवार , को-आॅरडीनेटर डॉ.विनोद पवार,मार्गदर्शक प्रो.अणिता दमगुंडे मॅडम,ग्रामसेवक विश्वासराव साहेब व सरपंच सौ.चांगुणा घुगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय डॉ.मुंडे यांच्या हस्ते मौजे. संगमवाडी ता.कंधार या गावी गुराढोरांचे लसीकरण आयोजीत करण्यात आले होते हे लसीकरण दि.23/जून/2022 रोजी पार पडले.

या लसीकरण शिबीरात 10 म्हशी व 5 गायी यांना हेमोरॅगीक सेप्टीसेमीया (Hemorhagic septisemia) आणि ब्लॅक कॉटर (Black Cotter) या लसी बॅक्टेरियल डीसीजेस साठी देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *