अहमदपुर ; प्रा भगवान आमलापुरे
अहमदपुर येथील पंचायत समितीच्या राजे शिव छत्रपती सभाग्रहात हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब यांना त्यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सबंध महाराष्ट्रभर हा दिवस क्रषीदिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एन डी राठोड, भारतीय बंजारा परिवर्तन अभियानाचे लातूर जिल्ह्यध्यक्ष नाथराव राठोड, महाराष्ट्र शासनाचा क्रषीभुषण प्राप्त प्रयोगशील शेतकरी धोंडोपंत कुलकर्णी, वळसंगी ; दुसरे पुरस्कार प्राप्त शेतकरी भारत दादा येरमे, तालुका कृषी अधिकारी श्री बी के जाधव, क्रषी विस्तार अधिकारी एस बी बुरूडकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

छाया : प्रा भगवान आमलापुरे.