नांदेड ; प्रतिनिधी
आज नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व सहयोगी आमदार श्री बालाजी कल्याणकर यांनी नांदेड तालुक्यातील निळा, एकदरा, आलेगाव व अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, बामणी या परिसरात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
आसना नदीच्या परिसरातील निळा, एकदरा, आलेगाव व अर्धापूर तालुक्यातील शेलगाव व बामणी परिसरात पावसाच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या व घर पिढीतांना तात्काळ अन्नधान्य पुरविण्याच्या सूचना तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

यावेळी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे, नांदेड तहसीलचे तहसीलदार किरण आंबेकर, अर्धापूर तहसीलच्या सौ.पांगरकर, नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरमिटवार सार्वजनिक बांधकाम अर्धापूरचे उप अभियंता विशाल चोपरे, लिंबगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आगलावे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, बालाजीराव शिंदे कासारखेडकर, बंडू पावडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अडवोकेट किशोर देशमुख, बालाजीराव सूर्यवंशी तळणीकर, डॉ.लक्ष्मणराव इंगोले, अशोक बुटले, बाबुराव हेंद्रे, बाबुराव पाटील कासारखेडकर, विराज देशमुख, कृष्णा देशमुख, सुनील राणे, आनंद पावडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
