नांदेड – मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात कुरुंदा गाव आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या नालयांना आलेल्या पुराचे पाणी कुरुंदा गावात शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. यामुळे घरातील जिवनावश्यक वस्तू सुद्धा पाण्यात वाहून गेल्या आहेत. पुरामुळे उघड्यावर आलेल्या पूरग्रस्त कुटुंबीयांना तातडीने दिलासा देण्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील,यांनी तातडीने संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला व गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी, शाखा कुरुंदा व गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील , गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर मार्गदर्शनाखाली कुरुंदा येथील पुरग्रस्त कुटुंबीयांना तातडीने खिचडीचे वाटप करून मद्तीचा हात पुढे केला.
गोदावरी फाऊंडेशन सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर राहून कार्य करत . आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रक्तदान, अन्नदान , महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल उपक्रम राबवून सामाजिक भान जपत असते . यावेळी कुरुंदा शाखेचे शाखा व्यवस्थापक बालाजी खराटे, कनिष्ठ अधिकारी राजू भोसले व संतोष गोलेवार यांनी सहकार्य केले .