अश्रू एकरुप झाले

Love is buch of Imotions.. अनेकदा शब्दातुन व्यक्त होतात तर कधी अश्रूतुन बोलायला लागतात आणि मग अश्रूच बोलायला लागतात…
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे…
त्या वाहणाऱ्या पाण्यात त्याचं तिला मिस करणं असतं, तिच्यासारखं व्यक्त होता येत नाही म्हणुन मनाशीच चाललेलं भांडण असतं… तिच्या प्रेमाला न्याय देउ शकत नाही म्हणुन गील्ट असतं आणि त्या वेडीला यातलं काहीच नको असतं..
त्याच्या खारट अश्रूतुन निघणारा गोडवा आणि त्यातुन वहाणारे शब्द तिला झेलायचे असतात,,.. पुढच्या जन्मी तुला माझी काय व्हायला आवडेल या त्याच्या प्रश्नावर तिचं प्रेयसी हे उत्तर ऐकुन तो म्हणतो बायको का नाही?? .. त्यावर ती म्हणते बायकोपेक्षा प्रेयसीचा मान वरचा असतो.. तिला हक्क नकोत , अधिकार नकोत ,ना तिला त्याच्या बाळाची आई व्हायचय.. तिला त्याची आई मैत्रीण बनुन सुख आणि आनंद द्यायचाय..
त्याची द्विधा मनस्थीती , तिच्यावर असलेलं प्रेम आणि व्यवसायात असलेल्या आर्थिक अडचणी या सगळ्याची मोट बांधताना अश्रूना रडु द्यायचय कारण व्यक्त होण्यासाठी त्याला काहीतरी हवय..
आए वो जिंदगी मे तुम बहार बनके .. हे गाणं एकाचवेळी दोघे ऐकत होते पण आपापल्या बेडवर कारण आपल्याला राधा कृष्ण यांचं प्रेम चालतं , त्याचे गोडवे गातो पण हेच प्रेम आपल्यासारख्या माणसानी केलं तर त्याला लफडं म्हणुन हिणवलं जातं यासाठीच कदाचित जन्म घेतला माझ्या बियॉन्ड सेक्स कादंबरीतील मिरा- सागरने..


सहज भेटलेल्या भेटीत इतकी मिठास असते हे त्याला आणि तिला दोघांनाही माहीत नव्हते कारण प्रेम मुळात ठरवुन होत नाही आणि झाले तर त्याला झिडकारायचा अधिकार आपल्याला कोणी दिला कारण त्यामागे शक्ती आहे जी आनंद सुख देत असते…

सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *