पैसा बोलता है

एक एक रुपयांची किंमत मात्र ती लहानपणी समजायची लहानपणी आपल्याला आपल्या आईवडिलांना आपण रडत-पडत पैसे मागत असतो. आपण नकळतेपणात असल्याने आपल्याला ते पैसे कसे आणि कुठून येतात याची जाणीव नसते. पण एक रुपया जरी आपल्या हातात आला ना त्याची किंमत मात्र खूप वाटते. ते पैसे घेऊन आपण दुकानात जाऊन चॉकलेट किंवा रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीकडून कधी पेप्सी तर कधी अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपली धावपळ असते. आणि ते आपण खाऊन आपला आनंद साजरा करत असतो..!

अलीकडच्या काळात मात्र आता चिल्लर पैशाला महत्व राहील नाही. कारण माणसांच्या गरजा खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतात. एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करायला जरी गेलो तरी तिथल्या वेटरला आपण 10 रुपये किंवा 20 रुपये देतो. मग त्या चिल्लर एक एक रुपयांची किंमत थोडीचं वाटणार आहे, रस्त्यावर भिकारी भीक मागताना त्याला सुध्दा 10 रुपयांच्या नोटपेक्षा कमी रक्कम नको वाटते. कारण प्रत्येक क्षेत्रात माणसांच्या गरजा खूप वेगाने वाढल्या आहेत..!

धावपळीच्या जीवनात जीवन जगत असताना आनंद कशाच्या माध्यमातून मिळवावा, असे अनेकजणांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर नेहमीच वाटत असते. माझं हे माझं ते या भानगडीत मात्र माणसाचं जीवन संपून जातं माणसात आपलेपणा अजिबात उरलेला नाही. कारण स्वार्थासाठी जगणारी मतलबी दुनिया आपल्याला पाऊला पाऊलाला पाहायला आणि अनुभवायला मिळत असते. आपण कोणासाठी कितीही करा शेवटी तो स्वार्थ दाखवल्याशिवाय राहत नाही. अनेकांच्या कामी पडणे हे चांगुलपणाचे लक्षण आहेत आणि आपल्या वाईट प्रसंगात ते धावुन येत नाहीत हे मात्र स्वार्थीपणाचे लक्षण आहेत..!

आज ज्यांच्याकडे जास्त पैसा त्याला अनेक प्रमाणात महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्याला मात्र कमी लेखण्याचे प्रकार या व्यवस्थेत पाहायला मिळत आहेत. पैशासाठी मानसन्मान, पैशासाठी अपमान, पैशासाठी नाते दूर, पैशासाठी घेतात एकमेकांचे जीव मग पैसा माणसाकडे किती असावा. पैसा हे जगण्याचे साधन जरी असले तरीही; त्यासोबतच माणुसकी सुध्दा जगण्याची उमेद आहे. समाजात वावरताना नुसता पैसा घेऊन माणूस जगू शकत नाही. माणसाकडे पैसा जरूर असावा परंतु पैशासाठी होणारे घात, माणसापासून माणुस दूर निघून जात असलेली साथ हे पण कुठे तरी जपता आली पाहिजे..!

          ◆◆◆ लेखक ◆◆◆
  • युवा साहित्यिक- सोनू दरेगावकर, नांदेड..! ●●● संपर्क ●●● मो. 7507161537

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *