भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा,गीत गायन स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेमधून प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आज रोजी करण्यात आले. या बक्षिस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास होनराव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार वैजनाथ गिरी, मधुकर लुंगारे, नामदेव जाधव,पो. कॉ. दत्ता जाधव, बळीराम श्रीमंगले, बालाजी जाधव ,नामदेव होनराव, राम वाघमारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी केंद्रे यांनी केले. तर कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शाळेचे सहशिक्षक बी.एस. भगनुरे, एन.एन.शिंदे, के.बी. कल्याणकर,एल. एन.सुरनर ,के. एस. वाघमारे व सहशिक्षिका आर.एम.बळवंते यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार आर. यु. मुळे यांनी केले. वरील सर्व कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व गावकरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.