कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्याचे वैभव, मन्याड खो-याची बुलंद तोफ,सर्वसामान्यांचे कैवारी,कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील खेडे गावात आणि वाडी तांड्यावर शिक्षणाची गंगा वाहती करणारे आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणारे आमचे प्रेरणास्थानआणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकररावजी धोंडगे साहेब यांच्या शतकपूर्तीनिमित्त आज विधानभवनात त्यांचा आदरपूर्वक गौरव करण्यात आला.
डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांनी केलेल्या कार्याबद्दल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज सदनाच्या आत आणि बाहेरही अनेक मान्यवर सदस्यांनी त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचे जाहीर कौतुक केले.
याप्रसंगी सोबत विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल नार्वेकर,मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ भाई शिंदे,उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते मा.ना.अजित पवार,नीलम ताई गोरे,नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माजी पालकमंत्री माननीय अशोकराव जी चव्हाण,माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आमदार मोहन अण्णा हंबर्डे,माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री आदित्यजी ठाकरे,पुरुषोत्तम भाऊ धोंडगे आदी मान्यवर तसेच सन्माननीय सदस्य