अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघच्या वतीने गुरु गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न ..!देशाची उज्वल पिढी घडवण्यात शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान – आमदार शामसुंदर शिंदे

कंधार ; प्रतिनिधी

देशात व समाजामध्ये महत्त्वपूर्ण घटक म्हणून शिक्षकांना आदर्श महत्त्व असून देशातील शालेय विद्यार्थी व नवतरुणाना दर्जेदार शिक्षण व योग्य दिशा देऊन देशाची उज्वल पिढी घडविण्यात शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे गौरवदगार
कंधार येथे आयोजित गुरु गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना लोहा, कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी बोलताना केले .

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा कंधारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरु गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कंधार येथे करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे, प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेड, गटविकास अधिकारी सुधीर मांजरमकर, गटशिक्षणाधिकारी संजय येरमे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, अखिल शिक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देविदास बस्वदे , एन.एम . वाघमारे ,चंद्रकांत मेकाले , हानमंत जोगपेटे , बालाजी डफडे , रवि केसराळीकर , शेकापचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई आनंदराव पांचाळ, मुनेश शिरशीकर, महेश   पिनाटे,  तानाजी कुट्टे , विकास राठोड , विष्णुदास माने , पिराजी केंद्रे, व्यंकटेश ढोणे आनंदा पांचाळ प्रमुख उपस्थित होते,

यावेळी कंधार तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांना आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते येथेचित सन्मान करून गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर ,पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू सह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *