नवरात्र उत्सवानिमित्त फुलवळ येथे रोकडेश्वर दुर्गा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन..

फुलवळ : धोंडीबा बोरगावे

आज पासून सुरुवात होत असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त कंधार तालुक्यातील फुलवळ येथे श्री रोकडेश्वर दुर्गा माता नवराञ उत्सव समितीच्या वतीने दैनंदिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२६/९/२०२२ रोजी सायंकाळी ८.०० वाजता दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा आणि घटस्थापना होणार आहे. दि . २७/९/ २०२२ रोजी सायंकाळी ९ :०० वाजता श्री श्री १०८ वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचे कीर्तन होणार आहे , दि.२९/९/२०२२ रोजी आदिमाया आदि-शक्ती आराधी मंडळ, हळी हंडरगुळी यांचा देवीच्या गीताचा व भारुडाचा कार्यक्रम होईल , दि.०१/१०/२०२२ रोजी बाल गणेश संगीत भजनी मंडळ मोजे झरी आणि जय हनुमान संगीत भजनी मंडळ मौजे वाखरड वाडी या दोन भजनी मंडळाच्या दिंड्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि.०२/१०/२०२२रोजी चोर सरगम कला संच माळाकोळी यांचा लोकगीतांचा कार्यक्रम, दि.०४/१०/२०२२रोजी बुगी-उगी अर्थात पंचक्रोशीतील लहान शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा डान्स चा कार्यक्रम, दि. ०५/१०/२०२२ रोजी सिमाल्लोघंन व महिषासुराचा वध, दि. ०६/१०/२०२२रोजी महाप्रसाद व श्री.रोकडेश्वर दुर्गा मातेची भव्य मरवणुक नंतर विसर्जन होईल. वरील सर्व कार्यक्रम भवानी नगर फुलवळ येथे होणार आहेत .

तरी सर्व कार्यक्रमांचा गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे अव्हान या कार्यक्रमाचे आयोजक श्री रोकडेश्वर दुर्गामाता नवरात्र महोत्सव कमिटी, फुलवळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *