दिव्यांगाना दिले पिठाची गिरणी व शिलाई मशिन

कंधार ;बहादरपुरा ग्रामपंचायतीचा आपला गाव आपला विकास कृती आराखडा अंतर्गत दिव्यांगाना वस्तू स्वरूपामध्ये पाच टक्के निधी खर्च करण्यात आले. चार शिलाई मशिन तिन पिठाची गिरणी व एका दिव्यांगाला झेराक्स मशिन देण्यात आल्या .

माणिक तुकाराम कांबळे शिलाई मशीन ,
शे. आलीना शेख चांद शिलाई मशीन ,
रेहान मोहम्मद शेख शिलाई मशीन ,
// अजिज शेख शिलाई मशीन व
श्रेयस कानगुले पिठाची गिरणी , गुरुनाथ मारोती अंबुरे पिठाची गिरणी , कल्याणी सोळंकी पिठाची गिरणी , समर्थ दुल्हेवाड झेरॉक्स प्रिंटर या सर्व दिव्यांग बांधवांना आज पाच टक्के निधी टक्केवारीच्या प्रमाणे वाटप करण्यात आले.

यासाठी बहादरपुरा नगरीचे माजी आमदार व सभापती भाई गुरुनाथराव कुरूडे , जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम धोंडगे, चेअरमन सेवाभावी संस्था मनोहर पेठकर , बहादरपुरा नगरीचे उपसरपंच हनुमंत पाटील पेठकर , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बळीराम पाटील पेठकर , ग्रामपंचायत सदस्य अवधूत पाटील पेटकर , ग्रामपंचायत सदस्य बालाजी तोटावाड , ग्रामपंचायत सदस्य कदम , भगवान पेठकर ,कल्पना ताई सदस्य, खरात ताई सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य शेख हैदर भाई , ग्रामसेवक शिवगिरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व समस्त गावातील दिव्यांग बांधव व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्व दिव्यांग बांधवांना वस्तू स्वरूपामध्ये पाच टक्के निधी देण्यात आला अर्शा माहिती दिव्यांग संघटना कंधार तालुका अध्यक्ष शेख दस्तगीर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *