20 टक्के पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद केल्यास माजी सैनिक संघटना शिक्षणासाठी भिक मागो आंदोलन करणार -जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड

 

कंधार ;20 टक्के पेक्षा कमी पट संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नका अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे′ जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकुर घुगे यांना निवेदनाद्वारे केली असून शाळा बंद केल्यास माजी सैनिक संघटना शिक्षणासाठी भिक मागो आंदोलन करण्यात येणार आहे .

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा 20 टक्के पेक्षा कमी पटाच्या बहुतांश शाळा ग्रामीण व डोंगराळ भागात आहेत. त्या ठिकाणी शैक्षणिक अनेक समस्या आहेत. डोंगराळ वाडी-वस्तीवर जन्म होणे हा त्या बालकाचा दोष नसुन तेथील शाळा पट संख्या अभावी बंद करणे हा त्या विद्यार्थ्यावर अन्याय करणारे आहे.

जिल्ह्यात खाजगी शाळेचा सुळसुळाट झालेला आहे. या खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस मनमाणी करुन आकारली जाते. त्यामुळे गोरगरीब मुलांचे शिक्षण अशा ठिकाणी घेणे कठीण होत असून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळा हाच उपाय राहिलेला आहे.

जिल्हा परिषद शाळा ही सेमी इंग्लिश करुन जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा वाढवावा जेणे करुन खेडे गावातील विद्यार्थी हे खाजगी इंग्लिश शाळामध्ये जाणार नाहीत आणि गावातील जिल्हा परिषद शाळांची पट संख्या ही वाढेल .

तात्काळ शासनाच्या वतीने घेतलेला निर्णय माघार घेऊन डोंगराळ भागातील विद्यर्थ्याच्या भविष्याला न्याय मिळवून देण्यात यावा. अन्यथा जिल्ह्यामध्ये तमाम माजी सैनिकांच्या वतीने तथा संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर शिक्षणासाठी भिक मागो आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी मागणी बालाजी चुकलवाड जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक विकास समिती, नांदेड यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *