फुलवळ ता.कंधार येथील रहिवासी असलेले परमेश्वर बाबुराव आमलापुरे हे ता. ८ सप्टेंबर २००५ साली भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. ते नुकतेच ता. ३० सप्टेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले असून काल ता. ९ ऑक्टोबर रोजी फुलवळ या जन्मभूमीत परत आले असून त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने मायभूमीत फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात गावभर भव्य मिरवणूक काढून कै. दिगंबरराव पटणे सांस्कृतिक सभागृहात जंगी नागरी स्वागत सत्कार करण्यात आला.
परमेश्वर आमलापुरे हे सैन्यदलात दाखल झाल्यापासून त्यांनी मिल ट्रेनिंग मडगाव, टेक्निकल ट्रेनिंग मंबोमलीम कॅम्प गोवा, कुपवाडा जम्मू- काश्मीर, एनएसजीकार्ड कॉम, थिंकिंग कॅट, मॅनकर्ड कॉम, सीएनजीसी, सीएमसी फोर्था पोस्टिंग प्रयागराज यूपी , उधमपूर , लखनौ यूपी आदी ठिकाणी सेवा बजावली आणि शेवटी जबलपूर येथून ते सेवानिवृत्त झाले.
या सत्कार समारंभच्यावेळी सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे, माजी सरपंच बालाजी देवकांबळे, ग्रा.प. सदस्य प्रविण मंगनाळे, श्रीकांत मंगनाळे, रहीम शेख, देवीदास फुलवळे , तंटामुक्तीअध्यक्ष डी. टि. मंगनाळे,होनाजी शेळगावे, भुजंग मंगनाळे, सलीम शेख, पोलीस पाटील इरबा देवकांबळे,दिलीप मंगनाळे,संदीप मंगनाळे, नीळकंठ मंगनाळे,खदीर मोमीन,विक्की मंगनाळे,मारोती फुलवळे, अंकेत मंगनाळे ,ओमकार डांगे, विठ्ठल मंगनाळे, धोंडिबा फुलवळे, पत्रकार बांधवा सह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम भुजबळ, संतोष मंगनाळे , प्रवीण मंगनाळे सह मित्र मंडळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत मंगनाळे, रामलिंग मठपती यांनी केले तर आभार प्रविण मंगनाळे यांनी व्यक्त केले.