-
कंधार ; नुकताच भारतीय संस्कृतिक परंपरेतील विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.त्याआधी नवरात्रोत्सवात संपूर्ण देशात घटस्थापना झाली.त्या घटस्थापणेसाठी लागणारे घट बारा बलुतेदार परंपरेतील मातीची भांडी तयार करणारे “कुंभार” कलावंत यांनी बनविले.आता घट तयार करुन थकलेले हात आता दीपोत्सवास लागणाऱ्या पणत्या बनविण्यात कार्यमग्न झाले.ही घटना गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांच्या दृष्टीस पडताच दीपोत्सवा आधी यावर रचनाकाव्य निर्माण करुन एक शब्दबिंब तयार झाले.