धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) बदल हा निसर्गाचा नीयम आहे. म्हणून तो मानवाचा पण आहे. महाविद्यालयानी नवीन आक्रतीबंधानुसार नँकला सामोरं जावं. असे प्रतिपादन डॉ आर टी बेद्रे यांनी केले.
येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील आय क्यु ए सी विभाग आयोजित रिव्हाइज्ड फ्रेमवक् आँफ अँक्रिडेअशन अँण्ड असेसमेंट आँफ काँलेजेस या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख आणि आमंत्रित वक्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी विनायकराव गुट्टे, कोषाध्यक्ष, जय भगवान सेवाभावी संस्था धर्मापुरी, होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ ए व्हि जाधव, इंग्रजी विभाग प्रमुख, श्री पंडितगुरु पाडी्कर महाविद्यालय, सिरसाळा उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ आर टी बेद्रे,( संचालक, यु जी सी, एच आर डी सी, डॉ हरिसिंग गौर विद्यापीठ, सागर, मध्य प्रदेश ) म्हणाले की कधी नव्हे तेवढे नँक आता सोपे झाले आहे. याच ४०- ४५ विद्यार्थ्यांवर आपण १०० प्रयोग करू शकतो. आणि नवीन नियमावली नुसार नँकला सामोरं जावू शकतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. प्रास्ताविक आणि संचालन डॉ पी डी मामडगे यांनी तर आभार प्रा अविनाश मुंडे यांनी मानले.