नांदेड प्रतिनिधी,
दरेगावमध्ये 24 वर्षापासून सुरू असणारी ज्ञानाची दिपवाळी हा अभिनव उपक्रम म्हणजे समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचा प्रयत्न होय.
या उपक्रमांचे अनुकरण गावागावात होण्याची खरंच गरज असल्याचे प्रतिपादन सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले. ते
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. हनुमंत मारोतराव भोपाळे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या ज्ञानाच्या दिपवाळी या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय पाटील शेळगावकर हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, यशदा पुणे येथील अधिकारी तथा लेखक बबन जोगदंड प्राचार्य डॉ. राम जाधव यांना प्रदान करण्यात आला. हनुमंत भोपाळे लिखित यशाचा राजमार्ग, शाल, पुष्पहार उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला..!
याप्रसंगी कामाजी पवार म्हणाले ‘ग्रामीण भागात छोट्याशा दरेगावात वैचारिक स्वरूपाची ज्ञानदीपाची दीपावली सुरू आहे याचे मला कौतुक वाटते. या दिपावलीच्या कार्यक्रमात मला दिलेला ज्ञानदीप राष्ट्रीय पुरस्कार महत्वाचा वाटतो. प्राचार्य राम जाधव म्हणाले ,’गुणवंत माणसं हेरून त्यांचा नि:स्वार्थपणे गौरव करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
डॉ. बबन जोगदंड म्हणाले, समाजाच्या विकासासाठी समाजाचा वैचारिक स्तर उंचावणे आवश्यक असते.
वैचारिक स्तर वाढण्यासाठी ज्ञानदीपाच्या दिपावली सारख्या कार्यक्रमाची नितांत गरज आहे.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित पवळे, पंडित कदम श्रीपत पाटील शिंदे शाहीर दिगू
तुमवाड, व्यंकटेश बैस, संजय मुधळे ज्ञानदीप दीपावलीचे महत्व सांगतीले.
पि.बी.वाघमारे यांनी सांगितले की,
घरोघरी ज्ञानदीप लागले तर अज्ञानरूपी अज्ञानरूपी अंधकार दूर होण्यास मदतकेली होईल
यांनी मनोगत व्यक्त केले..!
अध्यक्षीय समारोप करताना संजय पाटील शेळगावकर
म्हणाले ,’केवळ शासनावर अवलंबून राहिलेल्या गावाचा विकास होऊ शकला नाही. खरंच आपल्याला गावाचा विकास करायचा असेल तर गावातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा लागले. राजकीय वितंडवाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. ज्ञानाची दीप लावला पाहिजे हा सुंदर विचार घेऊन सुरू असलेल्या ज्ञानाची दीपावली ह्या अभिनव संकल्पनेचे
कौतुक वाटते असे त्यांनी सांगितले.
इंजिनिअर शिवाजीराजे पाटील जलदूत बाबुराव बस्वदे गुरूजी शाहीर दिगू तुमवाड, वक्ते पी.बी.वाघमारे,
सुप्रसिद्ध व्याख्याते रमेश पवार, प्रा.गणेश पवार साहित्यिक, ज्ञानेश्वर शिंदे, डॉ.शिवाजी कागडे, अंचोलीचे सुनिल पाटील मोरे, नायगाव सरपंच संघटना अध्यक्ष सचिन पाटील बेंद्रीकर कोलंबीचे माजी सरपंच उत्तम गवाले, कोलंबीचे सरपंच प्रतिनिधी प्रल्हाद बैस, नरंगलचे माजी सरपंच श्रीहरी देशमुख, नरंगलचे सरपंच पांचाळ, मांजरमचेे सरपंच निळकंठराव पाटील,
दरेगावचे माजी सरपंच मारोतराव पा. शिंदे, देवीदास पा. भोपाळे, प्रदीप पा. शिंदे, दरेगाव सरपंच प्रतिनिधी, संभाजीराव पा. शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव रामशेटवाड, दरेगाव उपसरपंच संग्राम रामशेटवाड, अशोक मोरे, ग्रामसेवक मुरलीधर बैलके दरेगावकर, शिवाजी शिंदे, जीवराज मांजरमकर, मोहनराव पाटील पवार, संजय पानपट्टे,
किशनराव वाकारे, तुकाराम पा. शिंदे, रामराव पा. शिंदे, विठ्ठल पा. शिंदे, मारोती ठाकुर, नारायण बैलके, दिगंबर घोनशेटवाड, संभाजी घोनशेटवाड, संभाजी आमनवाड, सूर्यकांत आमनवाड, शिवाजी आमनवाड, बालाजी आमनवाड, विश्वजित आमनवाड, संतोष आमनवाड, मारोती चिंतेवाड, बापूराव पा. चिंचाळे, दादाराव पा. चिंचाळे, श्रीराम पा. शिंदे, तुकाराम चिंतेवाड, केशव पा. शिंदे, बाबुराव कानगुले, पांडुरंग पा. शिंदे, रामदास पा. शिंदे, मारोती आमनवाड, किशन गजेलवाड, श्याम आमनवाड, देविदास पा. शिंदे, उत्कृष्ट फोटोग्राफी करणारे सादक शेख कोलंबीकर, विश्वजित पवळे, रमेश भोपाळे, केरबा भोपाळे, दत्ता बैलके, रामेश्वर घोनशेटवाड, विजय घोनशेटवाड, जळबा शिंदे, गणेश शिंदे, सतीश शिंदे, दत्ता गजेलवाड, गोविंद बैलके, सचिन बैलके, गोरोबा कानगुले, दिनेश शिंदे, विलास गायकवाड, हणमंत शिंदे, दासू गजेलवाड, शंकर भोपाळे, यांच्यासह दरेगाव व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले तर आभार युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष साळुंखे, विवेक भोपाळे,
नरहरी कानगुले आदींनी परिश्रम घेतले.