नांदेड ; दिव्यांग व्यक्तीचा समाजात मान सन्मान व्हावा,त्याचबरोबर विकास घडून यावे, त्यांच्या आरोग्याकडे सामान्य नागरिकाप्रमाणे लक्ष द्यावे आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी त्यांच्या हक्काबद्दल लोकांना जागृत करून लोकसहभागातून समानता यावि हे ब्रीदवाक्य घेऊन अपंगांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा आशावाद रयत सेवाभावी परिवाराच्या वतीने एक छोटासा प्रयत्न म्हणून गावातील दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यामध्ये श्री.माधवराव पा.मुकदम,श्री. दिगंबरराव जाधव साहेब, अर्धांग वायू ने ट्रस्त असलेले श्री. भिमरावजी सज्जन, श्री. शिवलिंग कारागीर पांचाळ, श्री. राजेश मोहन सज्जन, श्री. किरण गंगाराम सूर्यकार, श्री. प्रल्हाद चंद्ररराव सज्जन,शाहीर दिगू तुमवाड आधी दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी उपस्थित रयत सेवाभावी संस्थेचे संचालक इरवंत सूर्यकार, श्री.पुंडलिकराव पाटील हाळदेकर,श्री. दिगंबररावजी सज्जन,श्री. सुभाष भि. सज्जन, श्री. यादवराव इबितवार, शाहीर साहेबराव सूर्यकार आदींची उपस्थिती होती. अशी माहिती इरवंत रा.सूर्यकार, रयत ग्रामविकास आघाडी, सुजलेगांव यांनी दिली .